शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

आधीच दुर्दशा, त्यात पट कमी

By admin | Published: October 14, 2015 3:28 AM

हापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची चर्चा मध्यंतरी झाल्याने अशा शाळा असलेल्या गावांमध्ये पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले आहेत

दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची चर्चा मध्यंतरी झाल्याने अशा शाळा असलेल्या गावांमध्ये पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. काही ठिकाणी पुरेशी पटसंख्या व्हावी इतकी लोकसंख्याच नाही. शिक्षकांची उणीव, शाळांची दुर्दशा या नेहमीच्या विषयांचा भार असतानाच या कमी पटसंख्येचा विषयही ऐरणीवर आहे. या साऱ्या विषयाचा विविध भागांत पाहणी करून लोकमतने मांडलेला लेखाजोखा. खोर : दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सध्या जिल्हा परिषदेकडूनच ग्रहण सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अपुरा शिक्षकवर्ग, शिक्षकांवर लादण्यात आलेली शालाबाह्य कामे, पाण्याची टंचाई, सुविधांचा अभाव यामुळे प्राथमिक शाळांचे शिक्षक मेटाकुटीला आले आहेत.शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना शालेय पोषण आहाराची देखरेख पाहणे, लोकसंख्या सर्वेक्षण, निवडणूक कालावधीमधील कामे, जनगणना करणे, तालुकास्तरावरती वारंवार मीटिंग या शालाबाह्य कामांमुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक दर्जावर परिणाम होत आहे. देऊळगाव केंद्रामधील जिल्हा परिषदेच्या शाळानिहाय पटसंख्या पुढीलप्रमाणे : चौधरीवाडी (२0), पाटलाचीवाडी (३१), डोंबेवाडी (४७), खोर गावठाण (१३६), माने- पिसे वस्ती (२८), हरिबाचीवाडी (२७), पिंपळाचीवाडी (४२), देऊळगावगाडा (१00), बारवकरवाडी (७२), कुसेगाव (७0), विजयवाडी (२0), नरसाळ पट्टा (४0), शितोळेवस्ती (३0) अशी पटसंख्या आहे. एकूण ६६३ विद्यार्थी संख्या असलेल्या १३ जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी पाटलाचीवाडी, डोंबेवाडी, माने-पिसेवस्ती, हरिबाचीवाडी, देऊळगावगाडा या पाच शाळांवर शिक्षकांची पदे गेल्या वर्षापासून रिक्त आहेत. एकाच शिक्षकावर सर्व शालाबाह्य कामे पाहून इयत्ता पहिली ते ४थी पर्यंतचे वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागामधील या शाळांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी खरी जिल्हा परिषदेची आहे त्यानुसार पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. ४या केंद्रामधील डोंबेवाडी, देऊळगावगाडा, बारवकरवाडी या तीन शाळा आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त बनल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद एकीकडे शाळा आएसओ करण्यासाठी धडपड करीत आहे, मात्र जुन्या जीर्ण झालेल्या प्राथमिक शाळांकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न उभा राहिला आहे.४कारण खोर परिसरामधील चौधरीवाडी, खोरगावठाणमधील या शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. या शाळांच्या दुरुस्तीच्या संदर्भातील अनेक प्रस्ताव पंचायत समिती दौंड, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे देऊन वारंवार या संदर्भातील पाठपुरावा केला आहे. याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही ही मोठी खंत आहे. ४एखाद्या चिमुरड्याचा जीव गेल्यावरच जिल्हा परिषद जागी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. फुटलेली कौले, गळक्या भिंती यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या बाबींकडे काणाडोळा सध्याच्या परिस्थितीमध्ये केला जात आहे.४याबाबत माहिती देताना देऊळगावगाडा केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्रकुमार मोरे म्हणाले, की खोर व देऊळगावगाडा परिसरामधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग हा वेळोवेळी शाळेसाठी लाभत असतो. जूनपासून विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, हस्ताक्षर, चावडी वाचन, गणितीक्रिया यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. या बाबतचा विद्यार्थ्यांचा भौतिक दर्जा उत्कृष्ट आहे. गटविकास अधिकारी संतोष हराळे, गौतम बेलखेडे, विस्ताराधिकारी गोरख हिंगणे यांचे वेळोवेळी शाळेसाठी मार्गदर्शन लाभत असते.बारामती : तालुक्यात ४ शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे, तर ४ शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबाबत बारामती पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ वनवे यांनी माहिती दिली. तालुक्यातील सावकारवस्ती येथे ३, भगतवाडी ४, तर भगतवस्ती, बारवकरवस्ती येथे अनुक्रमे ५ आणि ७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर माळवाडी, परिटवाडी, हनुमाननगर, बारवनगर या शाळांमध्ये दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. टिळेकरवस्ती, वाबळेवस्ती, नेपतवळण, रसाळवाडी शाळांमध्ये ११ विद्यार्थी शिकत आहेत. माळीमळा, जाधववस्ती, ठोंबरेवस्ती, मानपावस्ती बंगला येथे १२ विद्यार्थी तर देऊळवाडी, मानेकराडेवस्ती, फाळकेवस्ती, शेरेवस्ती, पोंदकुलेवस्ती येथे १३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सावतामाळीनगर, गायकवाड ढोपरेवस्ती येथे शाळांमध्ये १५ विद्यार्थी तर मोढवे, आंबार, शेरेजाधव, येथे १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खोरेमळा, कुरणेवाडी, जोशीवाडी शाळेत १७ विद्यार्थी शिकत आहेत. याशिवाय गाडीखेल, ढासीवाडी, पाटलूर रसाळवाडी, हगारेवस्ती, जगदाळेवाडी, पठारेवस्ती शाळेत १८ विद्यार्थी शिकत आहेत. शिंदेवाडी, गावडेवस्ती, अहिल्यानगर, उंबरओढा, होळकरवस्ती, शेराचीवस्ती येथे १९ विद्यार्थी तर तांबेवस्ती शाळेत २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.