पुणे : शहरातील दाटीवाटीचा भाग वाढल्यामुळे नागरी समस्या वाढत चालल्या आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव याच मध्यवस्तीच्या भागात झालेला आहे. या प्रसाराला दाटीवाटी अधिक सहायक ठरत आहे. त्यामुळे शहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यावर ‘अर्बन रिन्यूवल’ चा पर्याय उपयोगी ठरु शकतो, असे मत नगररचना क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करु लागले आहेत.यापुर्वी प्लेगसह अनेक प्रकारच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. या साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणे आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि साथ रोगांच्यावेळी शहरातील दाट वस्तीतील लोकांना बाहेर हलविण्याचा निर्णय घेतला जातो. शहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळेले आहेत. या भागातील नागरिकांना शाळांमध्ये हलविण्याची तयारी पालिकेने सुरु केली होती. पालिकेने नागरिकांना शाळांमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. परंतू, हा मार्ग तात्पुरता आणि तात्कालीक आहे. यावर कायम स्वरुपी उपाय शोधण्याकरिता १९८२ च्या विकास आराखड्यामध्ये यासाठी ‘अर्बन रिन्यूवल’ अर्थात नागरी पुनर्निमाणाचा पर्यय दिलेला आहे.ज्या प्रभागात अथवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असेल अथवा क्षमतेपेक्षा अधिक असेल त्या भागात हा पर्याय वापरुन नव्याने विकसन करण्याची तरतूद आहे. लोकांचे दाटीवाटीने राहणे, त्यामधून निर्माण होणा-या आरोग्य विषयक समस्या, नागरी सुविधांवर येणारा ताण या पयार्यातून कमी करता येऊ शकतो. मुळाच अशा प्रकारे लोकसंख्येची घनता वाढू न देणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. ज्या भागात पुनर्निमाण करायचे आहे त्यागातील ठराविक परिसर, रस्ते आदी निवडून तेथील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाते. त्यांच्या नोकरीची ठिकाणे, उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती घेऊन त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.त्यानुसार, नागरिकांना शहराच्या अन्य भागात, उपनगरांमध्ये सोयीनुसार हलविणे, त्यांना घरे उपलब्ध करुन देणे हा एक पर्याय आहे. किंवा आहे त्याच ठिकाणी पुनर्निमाण करुन उभारलेल्या इमारतींमध्ये घरे देणे असाही एक पर्याय असतो. अलिकडच्या काळात राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या योजना 'नागरी पुनर्निर्माण' या प्रकारातच मोडतात. नगररचना कायद्यामध्ये दाटीवाटीच्या भागांचे पुनर्निमाण करण्याकरिता तरतूदी आहेत.=========सध्या कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेला भाग मध्यवस्तीत आहे. दाटीवाटीने नागरिक राहात असले तरी त्यांच्यादृष्टीने या भागात राहणे सर्वाथार्ने फायद्याचे आणि सोईचे आहे. त्यामुळे कितीजण बाहेर राहण्यास जातील असा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी जागेवरच पुनर्निमाण करणे हा एक पर्याय असू शकतो.=========लोकवस्ती शहराच्या हद्दीबाहेर हलवायची असल्यास त्यासाठी जागा शोधणे, घरे उभारणे आदी कामे करावी लागतील. वास्तविक शहराच्या बाहेर नव्या नगराचा विकास करण्यासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. जवळपास ८४२ गावे पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये समाविष्ठ करण्यात आली आहेत. पालिका हद्दीत वाढणारी लोकसंख्या या भागात जावी आणि लोकसंख्येची घनता कमी व्हावी हा त्यामागील हेतू होता. त्याला अधिक चालना देण्याची गरज आहे.============साथीचे आजार, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गावे अथवा लोकवस्ती हद्दीबाहेर हलविणे हा तात्पुरता उपाय असतो. १९८२ च्या विकास आराखड्यात लोकसंख्येची घनता कमी करण्यासाठी 'अर्बन रिन्युअल'ची कल्पना मांडण्यात आलेली आहे. त्याचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर ही घनता कमी करता येऊ शकते. तसेच नागरी सुविधांवर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि आरोग्य विषयक समस्यांनाही आळा घालता येऊ शकतो. या पयार्याचा विचार होणे गरजेचे आहे.- रामचंद्र गोहाड, नगररचनाकार
पुणे शहरातील ‘कंजेशन’ रोखण्याकरिता ‘अर्बन रिन्यूवल’चा पर्याय : तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 5:19 PM
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव शहरातील दाटीवाटीच्या मध्यवस्ती भागात..
ठळक मुद्देशहरातील हे ‘कंजेशन’कमी करण्याची आवश्यकता निर्माण साथींच्या वेळी गावेच्या गावे बाहेर हलविण्यात आल्याची उदाहरणेशहरातील पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक रुग्ण