'अमितभाई गुजरातचे असले तरी महाराष्ट्रावर जास्त प्रेम'; अजितदादांनी केलं जाहीर कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 02:09 PM2023-08-06T14:09:55+5:302023-08-06T14:12:23+5:30

केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं.

'Although Amit shah is from Gujarat, he loves Maharashtra more'; Ajit pawar gave public praise | 'अमितभाई गुजरातचे असले तरी महाराष्ट्रावर जास्त प्रेम'; अजितदादांनी केलं जाहीर कौतुक

'अमितभाई गुजरातचे असले तरी महाराष्ट्रावर जास्त प्रेम'; अजितदादांनी केलं जाहीर कौतुक

googlenewsNext

पुणे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर अजित पवार एकत्र आले. यावेळी पवार यांनी शाह यांचं कौतुक केलं. 

"तेव्हा २६ तासांत राहुल गांधींची खासदारकी काढली, आता ७२ तास झाले, तरीही..."

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशात सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास आहे. सहकार ग्रामीण भागापासून शहरात पोहोचला आहे. सहकार विभागाचे देशात मोठ योगदान दिलं आहे. देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे प्रत्येक गावात पोहोचले आहे. अमित शाह गुजरातमधून येतात पण त्यांच महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. त्याच कारण म्हणजे ते महाराष्ट्राचे जावाई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे,” असेही अजित पवार यांनी सांगितलं.

 उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी सहकार विभागाने मोठं योगदान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला. देशाच पहिले सहकारमंत्री अमित शाह झाले आहेत. देशात साखरेचं मोठं उत्पादन घेतलं जात. देशात सर्वच कारखाने आयकरमुळे अडचणीत आले होते, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय घेतला यामुळे अडचणीतून बाहेर पडले. अमित शाह यांनी लोकसभेत बील आणून सर्वच साखर कारखान्यांचा टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला. 

"२२ वर्षापासून आम्ही या विषयासाठी मागणी करत होतो. पण आता या संदर्भातील निर्णय अमित शाह यांनी घेतला, असंही अजित पवार म्हणाले.  

Web Title: 'Although Amit shah is from Gujarat, he loves Maharashtra more'; Ajit pawar gave public praise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.