टाकळी हाजी: गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे पॉलिहाऊस वाऱ्यांने उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वर्ष उलटले ,तरी सुद्धा अद्याप या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या खरिपात तरी आम्हाला नुकसान भरपाई मिळेल का असा सवाल तरुण शेतकरी वर्गातून केला जात आहे.
शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी असे आव्हान सरकार शेतकऱ्यांना करीत आहे .शेतीमधून कमी पाणी कमी क्षेत्र व कमी मनुष्यबळाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शासन शेतकऱ्याला .मार्गदर्शन तसेच अनुदान देत असते .शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. मात्र ज्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे तेथील शेतकऱ्यांनी कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करीत ग्रीन व पॉलिहाऊस उभारणी केली आहे .त्यासाठी शासनाचे अनुदान व इतर पैसे हे बँकेचे कर्ज घेऊन पॉलिहाऊसचे काम करण्यात आलेले आहे.यामधून फुले व भाजीपाल्याचे पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
गेल्यावर्षी जून मध्ये तालुक्यामधील सर्वच भागात वादळ वाऱ्या सह जोराचा पाऊस झाला .त्यामध्ये शेतकऱ्यांच्या ग्रींन हाऊस, पॉलिहाऊस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने त्यांचे पंचनामे देखील केले. मात्र वर्षे झाली तरी अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशी खंत कान्हुर मेसाई येथील प्रगतशील शेतकरी सुधीर फक्कडराव पुंडे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकांचे कर्ज काढून पॉलिहाउस केले आहेत. मात्र अवकाळी पावसाने आधुनिक शेतीचे स्वप्न त्यांचे भंगले असून बँकांची कर्जाची थकबाकी वाढत चालली आहे.
शिरूर तालुक्यात शेकडो लोकांची वादळी वाऱ्याने झालेली नुकसान भरपाई एक वर्ष झाले तरी अद्याप मिळाली नसल्यामुळे या वर्षीचा खरीप हंगाम तरी शासन नुकसान भरपाई देऊन सुरु ह करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
०२ टाकळी हाजी
कान्हूरमेसाई येथील सुधीर पुंडे यांचे ग्रीन हाऊसचे झालेले नुकसान.