शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

संजय राऊतांना बहुतेक 'अल्झायमर' झालाय! भाजपच्या चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 10:01 PM

'बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे असा इशारा शिवसेनेला दिला आहे.

पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो असं वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहे. दोन्ही बाजूने शाब्दिक चकमकी घडत असल्याचे दिसत आहे. आता या वादात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली त्यांनी थेट संजय राऊत यांना बहुतेक 'अल्झायमर' झाल्याचं दिसतंय अशी खरमरीत टीका केली आहे. 

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतानाच खोटं बोल पण रेटून बोल असं म्हणत सकाळी एक बोलायचं दुपारी एक. सायंकाळी त्यांना हेच लक्षात राहत नाही की दुपारी आपण काय बोललो. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय अशा शब्दात टोला लगावला.  

आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो, असे राऊत क्लिअर कट म्हणाले आहे. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, 'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है'बाबत विचारलं असता, पाटील म्हणाले, 'बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरुन थेट ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार असं आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. 

तुम्ही पेढे कसं वाटता, लाज नाही वाटत तुम्हाला ? संजय राऊत बेळगावला महाराष्ट्रात आणण्यासाठी शेकडो लोकांनी प्राण गमावले. बाळासाहेब तुरुंगात गेले होते. अन् याच बेळगावात मराठी माणूस हरल्यावर तुम्ही पेढे वाटता. लाज नाही वाटत तुम्हाला. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा