अभिजित डुंगरवाल ल्ल बिबवेवाडी
सुखसागरनगर येथील प्रमुख अंबामाता चौकात अतिक्रमण वाढले आहे. त्याठिकाणी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने दररोज पाच ते सहा अपघात होत आहे.
मार्केट यार्डपासून दक्षिण पुण्याचा झपाटय़ाने विकास होत आहे. पूर्वी सुखसागरनगर परिसरात प्रशस्त रस्ते आणि नागरिकांची वर्दळ कमी होती. परंतु, गेल्या काही वर्षात सुखसागरनगर परिसराचा झपाटय़ाने विकास झाला. त्याबरोबर रस्त्याभोवती अतिक्रमण वाढत चालली आहेत. आंबामाता चौकामध्ये वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने अपघात व वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे. अप्पर इंदिरानगरकडून येणारा रस्ता, गोकुळनगरकडे जाणारा रस्ता व सुखसागरनगरमध्ये जाणारा रस्ता असे तीन रस्ते अंबामाता मंदिरा समोर जोडले गेले आहेत. त्यामुळे गोकुळनगरकडे जाणा:या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे, तर सुखसागरनगरमध्ये येणा:या रस्त्याला तीव्र उतार आहे. अप्परकडून येणारा रस्ता अतिक्रमणामुळे प्रचंड अरुंद झालेला आहे. याचा परिणाम या ठिकाणी दररोज पाच ते सहा अपघात होत आहेत, तसेच मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडीदेखील होत आहे. बिबवेवाडी पोलीस ठाणो व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दी या चौकाच्या दोन्ही बाजूंनी आहेत, परंतु पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊन रस्त्यावर भांडणो होत आहेत. त्याठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे.
4सहकारनगर वाहतूक विभागाच्या हद्दीत हा भाग येतो. या ठिकाणी स्पीडब्रेकर, तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
4या ठिकाणी पीएमपीच्या बसचा थांबा आहे. या बसदेखील रस्त्याच्या मध्यभागी उभ्या केल्या जातात. रिक्षावाल्यांना अधिकृत थांबा असतानादेखील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षावाल्यांची वर्दळ असते.
4भाजीवाले व गाडय़ावाल्यांना येथील दुकानदारांनी पालिकेचे फुटपाथ भाडय़ाने दिले आहेत. काही भाजीवाले भाडे देण्यास परवडत नाही म्हणून रस्त्यावर आपली दुकाने लावताहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते.
4वाहनाचे आवाज व अपघातामुळे या चौकात व आजूबाजूच्या परिसरात व्यापार करणो किंवा राहणो देखील नागरिकांना अवघड होऊन बसले आहे.
4या सर्व समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
या चौकामध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, तसेच तिन्ही रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावेत,अशी आमची मागील एक वर्षापासूनची मागणी आहे. ही मागणी तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन करण्यासदेखील आम्ही तयार आहोत.
- अजित बाबर, अध्यक्ष, पुणो शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस
माङो या चौकात मागील पाच वर्षापासून मोबाईलचे दुकान आहे. मागील सहा महिन्यांपासून या चौकात प्रचंड रहदारी वाढली असून दररोज तीन-चार अपघात या ठिकाणी होत आहेत. संध्याकाळी अनेकांची भांडणोदेखील या ठिकाणी चालू असतात.
- श्रीमल बेदमुथा, व्यापारी अंबामाता चौक
या चौकामध्ये कायम स्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी यासाठी सहकारनगर वाहतूक विभागाच्या अधिका:यांना आम्ही लेखी पत्न तातडीने देत आहोत. स्पीडब्रेकर विषयी संबंधित खात्याच्या अधिका:यांसोबत या ठिकाणी पाहणी करून योग्य ती उपाययोजना केली जाईल.
- भारती कदम, स्थानिक नगरसेविका
या ठिकाणी असलेला पीएमटी थांबा पुढील दोन महिन्यांत पुढे असलेल्या ओढय़ाशेजारील मोकळ्या जागेत हलवण्यात येणार आहे. एक कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मोठा रस्ता आम्ही करून दिला, परंतु धनकवडी क्षेत्नीय कार्यालयाचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांना हा भागाच आपल्या हद्दीत आहे का नाही, याची माहती नसल्यामुळे हा रस्ता अतिक्रमण केलेल्या गाडय़ाच्या व भाजीविक्री करणा:या व्यापा:यांच्या स्वाधीन झाला आहे. वरिष्ठ अधिका:यांशी बोलून तातडीने येथील अतिक्रमणो काढून या ठिकाणची वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रय} केला जाईल.
- वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक