या भेटीचे मुख्य उद्दिष्टे गावातील शाळांना भेट देणे, तेथे असलेल्या सुविधांचे व उणिवांचे निरीक्षण करणे हे होते. एलपीएफच्या वतीने आलेल्या टीमने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री संभाजी विद्यालयाला भेट दिली.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना पाचपुते, शिक्षिका अनघा घोडके यांनी एलपीएफकडून आलेल्या शांतीराज दूतांशी संवाद साधला. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थी यांची शिक्षण तसेच क्रीडा, कला व सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाबद्दल माहिती दिली. शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या ४०८ आहेत. त्यातील विद्यार्थिनींची संख्या १८६ आहे.
लीला पूनावाला फाउंडेशन ही संस्था शैक्षणीक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना पाठबळ देते, महिला सशक्तीकरण हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्री संभाजी विद्यालयाची पाहणी करताना एलपीएफकडून रिता सेठीया, राधिका घोलप, ऐश्वर्या काशीद, रमा झा व इतर ८ मुली सहभागी होत्या. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थांनी मोलाचा सहभाग दाखवला. यावेळी उपसरपंच दिनेश जाधव, माजी सरपंच पुष्मा अमोल कोरडे, युवराज कोरडे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कोरडे, सुनील घोलप आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थांनी मोलाचा सहभाग दाखवला. त्यावेळी उपसरपंच दिनेश जाधव, माजी सरपंच पुष्पा अमोल कोरडे, वराज कोरडे , ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कोरडे आणि सुनील घोलप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
एलपीएफ संस्थेच्या शांतीराजदूतांनी बोरी बुद्रुक येथील श्री संभाजी विद्यालयाला भेट देऊन या विद्यालयाची पाहणी केली.