शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आंबेडकरांचा संघर्ष सर्व बहुजन समाजासाठी : काळे

By admin | Published: April 16, 2015 11:05 PM

देशात १ रुपयाचे योग्य मूल्य ठरविण्याचे सामर्थ्य केवळ डॉ. आंबेडकरांमध्ये होते. डॉ. आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला.

नारायणगाव : देशात १ रुपयाचे योग्य मूल्य ठरविण्याचे सामर्थ्य केवळ डॉ. आंबेडकरांमध्ये होते. डॉ. आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. काही लोकांनी बाबासाहेबांना दलितांचे कैवारी म्हणून त्यांचे विशाल कार्य मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. सर्व महापुरुषांनी आयुष्यभर जातीयता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आपण जातीयता वाढवत चाललो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार प्रा. कुमार काळे यांनी केले.जुन्नर तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वसंत व्हिला येथे सर्व महापुरुष व समाजसुधारकांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या वेळी ‘महापुरुषांच्या जीवनसंघर्षातून आपण कोणती प्रेरणा घ्यावी..?’ या विषयावर व्याख्यान देताना प्रा. काळे बोलत होते. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी आमदार शरद सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दीपक खैरे, अनिल मेहेर, आशा बुचके, बबनराव काळे, राज पाटे, रमेश हांडे, संभाजी साळवे, पोपट राक्षे, आशिष माळवदकर, योगेश पाटे, संतोष वाजगे, अतुल कांकरिया, आरिफ आतार, डी. के. भुजबळ, पंडित मेमाणे, पद्मभूषण गायकवाड, कवाळे उपस्थित होते.महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. आतिश उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशरण, पंचशील व सामुदायिक बुद्धवंदना घेतली. संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन शिल्पा कदम यांनी केले. दिनेश वाव्हळ यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. विलास कडलाक यांनी सूत्रसंचालन केले. सचिन लोखंडे यांनी आभार मानले. शेखर डबडे, पंकज खरात, पराग सोनवणे, नितीन पंडित, अनिल अभंग, प्रा. सुधीर रोकडे, डॉ. प्रदीप जोशी, दिनकर जाधव, संजय जंजाळ यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)बेल्हा : आणे येथील ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सरपंच श्वेतांबरी आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संगीता थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी किशोर आहेर, जावेद आतार, बाळासाहेब थोरात,अलीम जमादार, दिनकर शिंदे उपस्थित होते.वाल्हे : येथील परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त वाल्हे गावांतर्गत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.येथील सिद्धार्थनगरमध्ये तरुण मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाल्हेच्या सरपंच गोळे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गायकवाड, माजी सरपंच दत्तात्रय पवार, पिंगोरीच्या सरपंच पल्लवी भोसले, महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूर्यकांत भुजबळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, संतोष भुजबळ, दीपक कुमठेकर, नीलेश भोसले, विलास कुंभार, किरण गदादे, एम. आर. भोसले, दादा राऊत, प्रीतम भोसले उपस्थित होते. सायंकाळी आकर्षक ट्रॅक्टरमधून आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सचिन भोसले, अनिल भोसले व अतुल गायकवाड यांनी धम्मवंदना दिली. दीपक कुमठेकर यांनी प्रास्ताविक केले. अमोल गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर देवीदास भोसले यांनी आभार मानले.