देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या प्राणज्योत सोहळ्याची सांगता महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. महाळुंगे पडवळ गावात ज्योतीचे मुंबई येथून आगमन झाले. हुतात्मा बाबू गेनू व माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्याला आढळराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ज्योत बाबू गेनू यांच्या जन्मस्थळी सैदवाडीतील क्रांती ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. याप्रसंगी पं.स.सदस्य राजाराम बाणखेले, शिवसेना तालुका प्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, भाजपाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर,उपाध्यक्ष इसाकभाई इनामदार, बाबू गेनू यांचे पुतणे बबनराव सैद,डॉ.विठ्ठल चासकर, प्रा.वसंतराव भालेराव,यादव चासकर, संदीप पडवळ,अक्षय बोऱ्हाडे, सुशांत सैद, मारुती डोके, गौरव बारणे आदी उपस्थित होते.
बाबू गेनू यांच्या कार्यामुळे आंबेगावची ओळख : शिवाजीराव प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:28 AM