या वाहनात आॅक्सिजनवर असलेल्या लीला कुलकर्णी (वय ८०, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांना लगेच दुसऱ्या रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पाठविण्यात आले.
बी. एम. पाटील मेडिकल काॅलेज हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर या हाॅस्पिटलची आयसीयू असलेली रुग्णवाहिका विजापूर, कर्नाटकवरून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात कोरोना रुग्णाला घेऊन जात होती. चालक राजू खेगडेसह (रा. कर्नाटक) या रुग्णवाहिकेत एकूण ४ व्यक्ती होत्या. कुलकर्णी या लग्नकार्यासाठी कर्नाटक येथे गेल्या होत्या, तिथे त्रास झाल्याने कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता.
काळुबाई चौकातील बीआरटीच्या दुभाजकाला धडकून रुग्णवाहिकेला अपघात झाल्याचे समजताच रतन पवार व अमित शेवकर यांनी प्रसंगावधान राखून त्वरित दुसरी आॅक्सिजन असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. वानवडी वाहतूक पोलीस उपनिरीक्षक महादेव देसाई व हवालदार तिरुपती लिंगाण्णा त्याचबरोबर महिला पोलीस पल्लवी वाघचौरे व भारती गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती सांभाळली.