या वेळी मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, नगरसेवक सुमंत शेटे, तृप्ती किरवे, चंद्रकांत मळेकर, आशा रोमण, सोनम मोहिते, रुपाली कांबळे, सादिक फरास, पदमिनी तारु, अमृता बहिरट, स्नेहा पवार, देविदास गायकवाड, अनिल पवार, आशा शिंदे, वृषाली घोरपडे उपस्थित होते.
दरम्यान, निवडीनंतर आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते अमित सागळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे, कृष्णा शिनगारे रोहन बाठे, जगदीश किरवे, किसन वीर आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून भोर नगरपलिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मध्ये रस्ते, अंतर्गत गटारे व पाइपलाइन शौचालये अशी विविध प्रकारची १२ कोटींची कामे झाली असून सुमारे ५ कोटी कामे मंजूर आहेत. भविष्यात ती कामे होतील. त्याचबरोबर शहरातील पाणीपुरवठ्याचे काम लवकरच पूर्ण करुन भोर शहराला नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अमित सागळे यांनी सांगितले.
१५ भोर सागळे
आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते अमित सागळे यांचा सत्कार करण्यात आला.