लोकमत न्यूज नेटवर्कपुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी दुपारच्या सरकारी कार्यक्रमासाठी शनिवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले. रविवारचा कार्यक्रम पिंपरीत दुपारी १२ वाजता आहे. त्यानंतरही ते सायंकाळपर्यंत पुण्यात थांबणार आहेत. पक्षाचा कोणताही कार्यक्रम नाही, तरीही शनिवारची संपूर्ण रात्र व रविवारच्या कार्यक्रमाचा वेळ वगळता, शाह यांचा सगळा वेळ राखीव आहे. या राखीव वेळेचे रहस्य काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
नातेवाइकांची भेट शाह यांच्या मावशी पुण्यात मार्केट यार्डमध्ये राहतात. सायंकाळी ते मार्केट यार्डमध्ये मावशीच्या घरी गेले. त्यांची भेट घेऊन परत मुक्कामाच्या ठिकाणी आले. त्यानंतरचा सगळा वेळ त्यांनी राखीव ठेवला. रात्री उशिरा त्यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासमवेत बैठक होईल, अशी माहिती मिळाली.