पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे १२ ते १४ ऑगस्ट अशा तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. तसेच मनसेविद्यार्थी सेना, महिला सेना, पुणे शहरातील पदाधिकारी, यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमित ठाकरे १२ ऑगस्टला पुणे जिल्ह्यातील कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी करणार दौरा करणार आहेत. तर १३ ऑगस्टला पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघाचा दौरा करणार असून १४ ऑगस्टला शिरूर, चाकण आणि खेड मध्ये दौरा करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राजा ठाकरेंच्या तब्येतीमुळे पक्षबांधणी करण्यावर बंधने येत आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी संघटनेला बळ देण्याबरोबरच पक्षबांधणीचे काम करू लागले आहेत. त्या अनुषंगाने अमित यांनी मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाची सुरूवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता ते तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान ठाकरे हे पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहे.