लक्ष्मीकांत हा अकरा वर्षांचा विद्यार्थी असून तो व्यक्तिचित्र काढायला त्याला आवडतात. चित्र काढण्यामध्ये खूपच माहीर आहे ही पेरिविंकल स्कूलसाठी खूपच गौरवाची बाब असल्याचे मत अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी व्यक्त केले. त्याच्या कडे असलेला हा गुण ओळखूनच रिपोर्ट डे या दिवशी या विद्यार्थ्याला 'एक्सेप्शनल ॲचिव्हमेंट'चे पारितोषिक देऊन देखील गौरविण्यात आले होते. परंतु आता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरच्या लाइक मुळे दुधात साखर मिसळ्याचा मान त्याला मिळालेला आहे असं म्हणावं लागेल.
विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाला दुजोरा देत इतर सुप्त कलागुणांना देखील वाव देण्यासाठी पेरिविंकल शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, तसेच संचालिका रेखा बांदल हे कायमच तत्पर असतात. तर लक्ष्मीकांत या विद्यार्थ्याची ही कला खरोखरच वाखाणण्या जोगी आहे. तर त्याला घडविण्यामध्ये त्याचे पालक व कला शिक्षक नीता पवार यांचे खूप मोठे योगदान आहे. सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या लाईकनंतर पेरीविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, विभागप्रमुख निर्मल पंडित व रुचिरा खानविलकर यांनी लक्ष्मीकांत पांचाळ यांचे अभिनंदन करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
--
फोटो : कॅम्पस पानावरील फोटो
फोटो ओळ : लक्ष्मीकांत पांचाळ यांनी काढलेले अमिताभ यांचे चित्र
2 Attachments