शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Amol Kolhe | "शिवनेरीवर भगवा फडकलाच पाहिजे..." खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 2:20 PM

डॉ. अमोल कोल्हे यांचा शासकीय शिवजयंती कार्यक्रमावर बहिष्कार...

जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरी कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा या मागणीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा शासकीय शिवजयंती कार्यक्रमावर बहिष्कार टाकला खरा, मात्र त्यांच्या बहिष्काराची कुठेच दखल घेतली गेली नाही. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे शासकीय कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. मात्र, शासकीय कार्यक्रम संपल्यावर ते हातात भगवा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांसमवेत गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक झाले.

शिवजन्मस्थळ शिवनेरीवर १०० फूट उंच भगवा ध्वज लावावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे करीत होते. ही मागणी पूर्ण झाली नाही तर शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका खा. अमोल कोल्हे यांनी घेतली होती. परंतु, प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने खासदार कोल्हे कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. मात्र, शासकीय कार्यक्रम संपल्यावर ते हातात भगवा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांसमवेत गडावर आले. 

खासदार अमोल कोल्हे यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये," भगवा जाणीव आंदोलनात खांद्यावर स्वराज्याचा भगवा ध्वज घेऊन आपण सारे मनापासून सहभागी झालात! किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज डौलाने फडकलाच पाहिजे या भावनेतून आपण एकजुटीने केलेल्या या जाणीव आंदोलनास येत्या काळात यश मिळेलच! तमाम शिव-शंभू भक्तांच्या वतीने 1 वर्षाचा अल्टीमेटम आपण सरकारला दिला आहे, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन आपण हाती घेऊया!

आपण सर्वजण आलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो! आपण सर्वजण सुखरूप घरी जावे ही नम्र विनंती! येत्या काळातही हा लढा असाच तीव्र होत राहील, असे आपणांस आश्वस्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार!"

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेJunnarजुन्नरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रagitationआंदोलन