पुणे : नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून नवाब मालिकांना पाठिंबा दर्शवला जात आहे. ट्विटरवर वी स्टॅन्ड विथ नवाब मलिक असा हॅश टॅगही सुरु झाला आहे. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांचे ट्विट जोरदार चर्चेत आले आहे. ''पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी'' असं कोल्हे कवितेच्या माध्यमातून ट्विटरवर बोलले आहेत.
सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडीविनाकारण मारी धाडीवर धाडीसलते सत्तेवरील महा-आघाडीम्हणून कमळाबाईती लाविते काडीतपासयंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडीपाकळ्यांमध्ये नाहीत का काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा... पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी अशी कोल्हे यांनी कविता ट्विटरवरून टाकली आहे. आणि राष्ट्रवादी पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आम्ही लढू आणि जिंकू, - नवाब मलिक
नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लडेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. तसेच अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.
इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.