पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे, विविध पक्षांच्या प्रचाराने शहरातील वातावरण ढवळून निघत आहे. पुरुषांबरोवर महिला उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यामुळे यंदा सर्वच पक्षांनी प्रत्येक प्रभागामध्ये महिलांना संधी दिली आहे. त्यामुळे महिला मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. ज्यांच्या हातात सत्ता देऊ त्यांनी प्रभागातील नागरी समस्या सोडविण्यावर भर देण्याबरोबरच ‘तो’ किंवा ‘ती’ किमान शिक्षित असावी, अशी मतदारांची अपेक्षा असते. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या शिक्षणाचा आढावा घेतला असता उच्चशिक्षितामध्ये ‘ती’च आघाडीवर असल्याचे आशादायी चित्र आहे. पालिकेतील ३२ प्रभागांसाठी १२८ जागांसाठी ७५८ उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत. अंदाजे एकूण महिला उमेदवारांपैकी जवळपास ३८७ महिला सुशिक्षित आहेत. त्यामध्ये १८ उच्च पदवीधर, ४२ पदवीधर तर बारावी पास महिलांचे प्रमाण ५० इतके असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
उच्चशिक्षित उमेदवारांतही ‘ती’च सरस
By admin | Published: February 16, 2017 3:15 AM