शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

अ‍ॅमेनिटी स्पेससाठी २० पट रक्कम जास्त आकारणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 2:43 AM

पुणे शहरासह जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरिता अ‍ॅमेनिटी स्पेस (सुखसोयीयुक्त जागा) उभारण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

पुणे - शहरासह जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरिता अ‍ॅमेनिटी स्पेस (सुखसोयीयुक्त जागा) उभारण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. निधी उभारणीचा स्रोत म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खाजगी विकसकांना देण्यासाठी दहा गावांतील भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया केली जात आहे. मात्र वाघोली येथील प्रकल्पासाठी अव्वाच्यासव्वा बयाणा रक्कम आकारली जात असल्याचा आरोप होत आहे. तीन कोटी तीस लाख रुपयांच्या जमिनीच्या भाडेपट्याच्या लिलावासाठी तब्बल ६६ लाख रुपये बयाणा रक्कम भरावी लागणार आहे.मांजरी बुद्रुक, वाघोली, पिसोळी, लोणीकंद, वराळे, माण, सुस, हिंजवडी, बावधन बुद्रुक, अशा १० गावामधील एकूण १९ भूखंडाचा समावेश आहे. नऊ गावांना लावलेल्या नियमापेक्षा वाघोलीसाठी तब्बल २० पट अधिकची रक्कम आकारली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेलिलावात सहभागी होणाऱ्यांना पीएमआरडीएकडून ‘की’ घ्यावी लागणार आहे. ‘प्रीबिड’ मध्ये निविदाधारकांशी झालेल्या चर्चेचे इतिवृत्तही आॅनलाईन प्रसिध्द करणे अपेक्षित होते. परंतु,ते केलेले नाही, अशी तक्रार आहे.निविदेच्या इतर अटींमध्ये निविदाधारकाला विकसनाचा अनुभव असावा असे म्हटले आहे. वास्तविक अ‍ॅमेनिटी स्पेस असल्याने डॉक्टर, शैक्षणिक संस्थाही जागेची मागणी करू शकतात. त्यांना बांधकाम विकसनाचा अनुभव असेलच असे नाही. त्यामुळे केवळ बिल्डरच्या फायद्यासाठी हा नियम असल्याचा आरोप केला जात आहे.सुविधा भूखंड अनुज्ञेय वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने दिले जातील. ई-लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अनुज्ञेय वापर पाहता या सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास मदत होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल.- किरण गित्ते,आयुक्त, पीएमआरडीएनागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणारदहा गावांतील सर्व नियमावली तयार करणारे पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरे म्हणाले, वाघोलीतील प्रकल्पासंदर्भात काही नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्यांच्या सर्व तक्रारी-शंकाचे निरसन करण्यात येईल. निकष नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येतील.सुविधा भूखंडाच्या ई-लिलाव प्रक्रियेस मुदतवाढई-लिलाव पद्धतीने समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या संकेतस्थळावर निविदाधारक यांच्यासाठी (दि.१५) पासून १० दिवसांची मुदतवाढ देऊन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.या निविदा सादर करण्यास २५ जूनपर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. १५ जून रोजी दुपारी ३ वाजता पीएमआरडीए कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ई-लिलाव प्रक्रिया ९ जुलै रोजी राबविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या