शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नृत्यक्षेत्रातील आदिसंस्थेचा अमृतमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:09 AM

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची ...

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची मुलगी नृत्य शिकते’, असं पालक अभिमानानं सांगतात. गायनकला आणि नाट्यकला या आपल्या वैभवाचा काळ उपभोगत असतानाच्या त्या दिवसांत नृत्यकला मात्र केवळ चित्रपटांच्या पडद्यावर काय ती दिसत होती. सार्वजनिक जीवनात ती अंग चोरुनच वावरत होती. अशा सर्वस्वी प्रतिकूल वातावरणात १० जुलै १९४७ रोजी डेक्कन जिमखान्यावरच्या ‘कलामंदिर’ या वास्तूमध्ये पं. रोहिणी भाटे यांनी एका लहानशा नृत्यवर्गाच्या रुपात ‘नृत्यभारती’ ही संस्था सुरु केली. पुण्यातल्या पांढरपेशा वर्गातल्या एका सुशिक्षित तरुणीनं सुरु केलेला हा पहिलावहिला नृत्यवर्ग ! ही संस्था यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे.

पुण्यासारख्या शहराला आपल्या नृत्यविषयक धारणांमध्ये बदल घडवायला लावून, पारंपरिक, बाळबोध आणि काहीशा पूर्वग्रहदूषित कल्पनांमधून मुक्त करणारी ही संस्था भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी स्थापन व्हावी, हा भाग्यशाली योग म्हणायला हवा. कारण पुण्याच्या सांस्कृतिक अवकाशात आता नृत्यकला प्रतिष्ठेनं आणि दिमाखानं विराजमान झाली आहे, याचा ओनामा केला ‘नृत्यभारती’ या संस्थेनं !

७५ वर्षांची ही वाटचाल सोपी मुळीच नव्हती. रोहिणीताईंनी आपल्या उपजत प्रतिभेला व्यासंग आणि साधनेची जोड देत अहर्निश ध्यास घेऊन केलेल्या नृत्यविषयक चौफेर कामगिरीमुळे संस्थेचा आलेख सतत चढताच राहिला. अनेक लहानमोठे कलाकार संस्थेशी जोडले गेले, अनेक कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांच्याकडे केली. अगणित स्फुट रचना,अनेकविध नृत्यात्मिका (ballets),‘नृत्यभारती’च्या श्रेयगणतीमध्ये आहेत. ‘नृत्यभारती’च्या नृत्यसंचाच्या कितीतरी परदेशयात्रा,स्वतः रोहिणीताईंच्या विदेशयात्रा असं त्यांचं कार्यक्षेत्र सर्वसमावेशक आहे. गुरु, संरचनाकार,वाग्गेयकार तर त्या होत्याच पण नृत्यविषयक लेखन करणं, विद्यापीठीय चर्चासत्रात शोधनिबंध वाचणं अशा वैचारिक आणि अकादमिक पातळीवरही त्यांचं योगदान अनन्य आहे.

एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा आधार असलेली पुण्यातली ही आद्य नृत्यसंस्था. कोणतेही सरकारी वा अन्य खाजगी आस्थापनांचे आर्थिक पाठबळ नसूनही गुणवत्ता आणि निष्ठा या दुर्मिळ होत चाललेल्या गुणांच्या भक्कम पायावर उभी असलेली. १९५० च्या आसपास सुरु झालेला पुण्याचा ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ किंव पी. डी. ए. सारखी नाट्यसंस्था डोळ्यांपुढे आणली तर ‘नृत्यभारती’नं सुरु केलेल्या नृत्यचळवळीचं महत्त्व लक्षात येईल. आज इथे विविध नृत्यशैलींचे अनेक वर्ग सुरु आहेत.असंख्य विद्यार्थी नृत्यकलेचं शिक्षण घेत आहेत. उत्तरेकडच्या लोकांना इथल्या नृत्याची दखल घ्यावीच लागते आहे. इथे नृत्यचळवळ उभी करण्याचं आणि कथकच्या रूढ चौकटीला रुंदावण्याचं श्रेय, निखालसपणे रोहिणीताई-‘नृत्यभारती’ यांचं आहे.

वस्तुतः कथक ही उत्तर भारतामधली कला. महाराष्ट्राला तिचे नावही अपरिचित होते तेव्हा ही कथकची परंपरा जणू भगीरथ प्रयत्नांनी इथल्या मातीत, या ‘राकट,कणखर दगडांच्याही देशात’त्यांनी रुजवली. आज पुणं हे दक्षिणेतलं महत्त्वाचं कथक केंद्र म्हणून मान्यता पावलं आहे, ही त्यांची आपल्याला अभिमान वाटावा, अशी मौलिक ठेवा आहे.

‘नृत्यभारती’च्या या वैभवशाली इतिहासात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांवर वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाले.संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात म्हणजे १९७२ साली ह्या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली.त्यानंतर संस्थेला ४० वर्ष झाल्यानिमित्त,सुवर्णमहोत्सवी वर्षात आणि संस्थेला ७० वर्ष झाल्यानिमित्त झालेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम पुणेकरांच्या स्मरणात आहेत.या वर्षी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जरी नाही तरी आभासी मंचावर वर्षभर कार्यक्रममालिकेचं आयोजन केलं आहे. १० जुलैला ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या मोठ्या सोहळ्याचा पुनःप्रत्यय मिळणार आहे. या कार्यक्रमात रोहिणीताईंचं स्वतःचं नृत्य आणि त्यांनी निर्मिलेल्या काही रचनांचं संक्षिप्त दर्शन घडेल.तर या वर्षातील प्रत्येक महिन्यात एक पूर्ण लांबीचा कार्यक्रम, संस्थेतील नवोदित कलाकारांचं नृत्यसादरीकरण,तज्ज्ञांशी चर्चा,मुलाखती असे ... भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.१० जुलै रोजी होणारा ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता ‘नृत्यभारती’च्या फेसबुक पेजवर पाहता येईल.