Pune News: पुणे खंडपीठासाठी कृती समिती स्थापणार, बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 09:08 AM2022-09-28T09:08:48+5:302022-09-28T09:11:07+5:30

कृती समितीचे कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला

An action committee will be set up for the Pune bench high court mumbai | Pune News: पुणे खंडपीठासाठी कृती समिती स्थापणार, बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

Pune News: पुणे खंडपीठासाठी कृती समिती स्थापणार, बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

Next

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या मागणीच्या पूर्ततेसाठी पुणे बार असोसिएशनच्या बैठकीत एक कायमस्वरूपी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृती समितीचे कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुढील दिशा आता पुणे खंडपीठ कृती समिती ठरविणार आहे आणि त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य हर्षद निंबाळकर, अहमदखान पठाण आणि राजेंद्र उमाप यांच्यासह बार कौन्सिलचे चेअरमन डॉ. सुधाकर आव्हाड आणि डी. डी. शिंदे यांच्यासह बार असोसिएशनचे अनेक माजी अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

कायमस्वरूपी कृती समितीची गरज असून ही कृती समिती लवकरच जाहीर करणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांनी सांगितले.

Web Title: An action committee will be set up for the Pune bench high court mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.