पुणे : महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी पालिकेने साडेआठ कोटींचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. या पूर्वगणनपत्रकाला इस्टिमेट कमिटीने मंजुरी दिली आहे. या स्मारकासाठी दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली. भिडे वाड्याचे स्मारक तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे उभारण्यात येणार आहे. तळघरात दुचाकी पार्किंग असेल. तळमजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे असणार आहेत.
पहिल्या मजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य विविध भाषांमध्ये चलचित्रांच्या मार्फत पाहण्याची, ऐकण्याची सुविधा निर्माण करण्यात येईल. त्यावरील मजल्यावर ग्रंथालय आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याची व्यवस्था करण्यात येईल. या स्मारकासाठी साडेआठ कोटीचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. पालिकेच्या इस्टिमेट कमिटीमध्ये या पूर्वगणन पत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर या स्मारकासाठी दोन दिवसात निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती भवन रचना विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली.