शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

इंदापूर परिसरात अतिदुर्मिळ पाणमांजराला ७ तासानंतर विहिरीतून काढले बाहेर

By श्रीकिशन काळे | Updated: November 10, 2024 18:02 IST

अत्यंत दुर्मीळ असे युरेशियन ऑटर हे जंगली भागातील ओढे व काही नद्यांमध्ये आढळून येते

पुणे : इंदापूर परिसरातील एका खेड्यातील विहिरीत दुर्मिळ असे पाणमांजर अडकून पडले होते. त्या पाणमांजराला दौंड येथील इको-रेस्क्यू पथकाने सुखरूप बाहेर काढले आणि पुण्यातील रेस्क्यू उपचार केंद्रात पाठविले. त्यावर उपचार करून पुन्हा अधिवासात सोडण्यात येणार आहे. तब्बल ७ तासानंतर या पाणमांजराला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

इंदापूरवनविभागातील कर्मचाऱ्यांना पाणमांजर (Otter) विहीरीत पडल्याची माहिती मिळाली होती. वनविभागाचे कर्मचारी आनंद हुकिरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व दौंड येथील पथकाला पाचारण केले.  पाणमांजराचे अस्तित्व १९९० ला शेवटी उजनी पाणलोट क्षेत्रात आढळून आल्याचे सांगण्यात येते, पण मागील अनेक वर्षात या जातीचे मांजर कोणाच्याही निदर्शनात आले नव्हते. ज्या विहिरीत हे पाणमांजर पडले होते, या गावाजवळ उजनी तसेच नीरा नदीचे पाणलोट क्षेत्र काही अंतरावर आहे. मात्र यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे आजूबाजूचे सगळे कॅनॉल व ओढे वाहत आहेत. विहिरीपासून १ किमी परिसरातून मोठा कॅनॉल गेला आहे. कदाचित या प्राण्याचा अधिवास आज देखील या भागात दिसून येत आहे. 

भारतात पाणमांजराच्या तीन प्रमुख प्रजाती सापडतात. त्यातील अत्यंत दुर्मीळ असे युरेशियन ऑटर हे जंगली भागातील ओढे व काही नद्यांमध्ये आढळून येते. हेच उरेशियन पाणमांजर तालुक्यातील निमगाव केतकी गावाजवळील गोतंडी या गावात विहीरीत पडल्याचे आढळून आले. 

दौंड येथील इको रेस्क्यू पथकाचे प्रमुख नचिकेत अवधानी व डॉ. श्रीकांत देखमुख यांनी युरेशियन ऑटर पाणमजर प्रजातीचे प्राणी आहे, हे लक्षात आल्यावर पाण्यात पोहण्यासाठी तरबेज असलेल्या प्राण्याला पकडण्यासाठी पाण्यात पिंजरा सोडून ३ तास वाट पाहिली. तरी देखील पाणमांजर काही पिंजऱ्यात येईना, शेवटी पिंजऱ्यात खाद्य ठेऊन देखील पुढील काही तास पाणमांजर पिंजऱ्याजवळ येत नव्हते. शेवटी थोडा अंधार पडला आणि त्याच वेळी भूक लागल्यामुळे पाणमांजर पिजऱ्यात आले. ७ तास सलग प्रयत्न करुन या अति दुर्मिळ व लाजाळू पाणमांजराला पकडण्यात यश आले.  

प्राथमिक तपासणी केल्यावर विहीरीत अडकून पडल्यामुळे या पाणमांजराला काही जखमा झाल्याचे समोर आले.या संपूर्ण रेस्क्यू मध्ये वनविभागाचे इंदापूर विभागाचे कर्मचारी मिलिंद शिंदे, शुभम कडू, शुभम धायतोंडे, अनंत हुकिरे तसेच इको रेस्क्यू पथकाचे नचिकेत अवधानी, डॉ. श्रीकांत देखमुख, प्रशांत कौलकर तसेच स्थानिक पर्यावरण प्रेमी फ्रेड्स ऑफ नेचर क्लबचे वैभव जाधव देखील उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणNatureनिसर्गSocialसामाजिक