शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 7:45 PM

मुलाच्या मृतदेहाला दोरी आणि मोठे दगड बांधून विहिरीत फेकून दिले होते

बारामती : दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा वयोवृध्द मजुर दांपत्याने सुपारी देऊन खुन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मजुर दांपत्य , सुपारी घेवुन खुन करणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी एका ३०ते ४० वयोगटातील अनोळखी युवकाचा निर्घृण खुन करुन त्याचा मृतदेह रस्सी व तारेने मोठे दगड बांधुन शिर्सुफळ (ता बारामती) येथील पाण्याच्या तलावात  फेकुन दिला होता. त्यानंतर दाखल झालेल्या या गुन्ह्याचा शोध तालुका पोलिसांचे तपास पथक हे आजुबाजुच्या गावात घेत होते. याच दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत रावणगाव (ता दौंड) येथील कुटंबाबाबत माहिती मिळाली. पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई पोपट बाराते व मुलगा सौरभ पोपट बाराते हे गावातुन गेल्या ३ महिन्यापूर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर १५ दिवसांनी केवळ बाराते दांपत्यच गावातील घरी परत आले आहेत. मात्र, मुलगा सौरभ हा त्यांचे सोबत आला नसल्याची खात्रीशीर माहीती माेरे यांना मिळाली. पोलीसांनी शुक्रवारी( दि ३१) पोपट बाराते याच्याकडे मुलगा सौरभ व पत्नी  मुक्ताबाई यांचे ठावठिकाण्याबाबत विचारणा केली. यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मला काही माहीत नाही ,माझ्या पत्नीला विचारा असे सांगितले. त्यावर पोलिसांनी बाराते दांपत्याची मुलगी निलम खुरंगे (रा खुरंगेवाडी ता कर्जत जि अहमदनगर ) हीच्याकडे गेलेल्या मुक्ताबाई बारातेचा शोध घेतला. यावेळी मुक्ताबाईने पोलिसांनी केलेल्या चाैकशीत मुलगा सौरभ मला दारु पिऊन येऊन मला मारहाण करुन मला व माझे पती पोपट यांना त्रास देत होता. त्यामुळे गावातील बबलु तानाजी पवार याला मुलगा सौरभला जिवे ठार मारण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयेची सुपारी दिली होती. त्यानुसार बबलु याने त्याचे मित्र बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे, अक्षय चंद्रकांत पाडळे असे मिळुन तिघांनी  सौरभ यास ठार मारल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह शिर्सुफळ येथील तलावमध्ये दगड बांधुन टाकुन दिल्याचे देखील सांगितले. त्यानंतर  गुन्हयातील आरोपींना या प्रकरणी  अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू