पुणे :पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या आयटी इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या इंजिनिअरचे नाव अभिजित जांभुरे असून तो मुळचा साताऱ्याचा आहे. तो हिंजवडी येथे आयटी कंपनीत काम करतोय. अभिजितला ओडिशा पोलिसांनी अटक केली आहे. तो २०१९ पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियामधून अभिजितकडून ओटीपी विक्री आणि शेअर केले जात होते. पुण्यातील आयटी हब हिंजवडी परिसरातील एका कंपनीत तो काम करत होता. चार वर्षांपासून तो पाकिस्तानातील हेरांच्या संपर्कात होता. त्यांना तो पैशांच्या बदल्यात ओटीपीची विक्री करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ओडिशा पोलीस गेल्या काही महिन्यांपासून याप्रकरणी तपास करत होते. याअगोदर काहीजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच अभिजितची माहिती मिळाली होती. अभिजित हा मुळचा सातारचा आहे. त्याने गुजरातमधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने हिंजवडीत नोकरी सुरू केली होती. ओडिशा पोलिस आरोपी अभिजितला ओडिशाला घेऊन गेले आहेत.
जांबुरे गेल्या अनेक वर्षांपासून सतत पाकिस्तानी गुप्तचर आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. २०१८ मध्ये तो फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिक सय्यद दानिश अली नाकवीच्या संपर्कात आला. नाकवी हा फैजलाबादचा रहिवासी असून, त्याने स्वत:ची ओळख चेगमध्ये अमेरिकन एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीत काम करणारा फ्रीलान्सर म्हणून केली होती. जांबुरेने त्याचा युजर आयडी आणि चेगचा पासवर्ड दानिशला नाकवी दिला.दानिशने काही लोकांना जांबुरे याच्या वतीने एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीसाठी काम करायला लावले. ओडिशा आणि देशाच्या इतर भागांतील सायबर चोरट्यांकडून ओटीपी, खासगी माहिती आणि बँक खाती खरेदी केलो. त्याच्या बदल्यात कामाचे पैसे जांबुरे यांच्या भारतातील बँक खात्यात जमा झाले. आणि जांबुरेने पाकिस्तानसाठी काम करणार्या एजंट्सना पैसे दिले. असे एसटीएफच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दानिशने नंतर जांबुरेची ओळख त्याचा मित्र अब्दुल हमीद उर्फ खुर्रमशी केली करून दिली जो कराचीचा रहिवासी आहे. खुर्रम हा पाकिस्तानी लष्कराचा एक वरिष्ठ गुप्तचर अधिकारी असून त्याच्याकडे भारतात एजंटांचे मोठे नेटवर्क आहे. खुर्रमच्या सूचनेनुसार जांबुरेने भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तचरांना पैसे हस्तांतरित केले. एसटीएफच्या तपासात असे दिसून आले की जांबुरेने व्हाट्सअपवर किमान सात पाकिस्तानी आणि १० नायजेरियन नागरिकांशी संपर्क केला.
कोण आहे अभिजित जांबूरे?
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या जांबुरे याने गुजरातमधील आणंद येथील सरदार पटेल विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करत होता. जांबुरे गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातील पदवीधर आहे. त्याने सांख्यिकी विषयातील पदवी मिळवली आहे.