बारामती : राजकारणात तराजु लावायाचा असताे. त्यानुसार यंदा आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त वजनदार आहे. २०१९ चे सरकार ज्यांच्यामुळे गेले. आज पवार कुटुंबियांच्या फुटीवर चर्चा होते. त्यावेळी लोकांनी मतदान करुन आमच्या १६१ जागा निवडुन दिल्या. त्यावेळी शिवसेनेला पवार यांनी बाहेर काढल, ती फुट नव्हती का. ३३ महिने महाराष्ट्राचा काय विकास झाला. आम्ही तुमच्या बरोबर महाराष्ट्रात सरकार करतोय म्हणत माझ्या दोन नेत्यांना, सगळ जग ज्यांना मानते त्यांना पवार यांनी झुलवत ठेवले. त्यामुळे भाजपचे नुकसान झाले नाही. तर महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आम्हाला पवार यांचा हिशोब करण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे, अशी टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केली. बारामती येथे आयोजित भाजप आणि मित्रपक्षांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
पाटील पुढे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस बरोबर नसताना भाजप उमेदवाराला ५ लाख ३१ हजार मते मिळाली होती. यंदा अजित पवार आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय गणितानुसार किमान दोन लाख मतांची भर त्यात पडेल. शिवाय गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार आणि पावणे दाेन वर्षात महायुती सरकारने केलेल्या कामाची पुंजी आमच्याबरोबर आहे. त्यामुळे यंदा महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी होइल. मागील मतदान आणि यंदाची अजित पवारांची साथ यामुळे आमचे विजयाचे गणित सोपे असल्याचे पाटील म्हणाले.
महादेवराव जानकर महायुतीचे सदस्य आहेत. पंकजा मुंडे यांचे त्यांचे बहिण भावाचे नाते आहे. देवेंद्र फडवणीस यांचे परममित्र आहेत. मैत्री असते त्यावेळी माणुस ह्क्काने भांडतो. त्यांच्याशी राजकीय गणितांची देवेंद्र चर्चा करतील. त्यामुळे शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांची काळजी करु नका. जानकर देवेंद्र फडवणीस यांचे मित्र आहे. प्रत्येकाचे देवेंद्र फडवणीस यांचे गणित जुळलेले आहे.
महायुतीत छोट्याा घटक पक्ष्यांना संपविण्याचे काम भाजप करीत आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत करीत आहेत. या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, असे त्या छोट्या घटक पक्ष्यांना वाटले पाहिजे,राऊत यांना काही कामधंदा आहे का, असा सवाल करीत या राज्यात माध्यम काही लोकांना अनावश्यक मोठे करतात, असा टोला यावेळी पाटील यांनी लगावला.
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेचा शब्द मागितला आहे,या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१९ मध्ये हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही ५ लाख ३१ हजार मते भाजपला मिळाली. त्यावेळी ते काॅंग्रेसमध्ये होते.ते त्यांना आलेल्या कटु अनुभवामुळे बोलत आहेत. आमच्याकडे संपुर्ण महाराष्ट्राल समजवणारे आैषध आहे. पाटील यांना ते प्रेमाने समजावुन सांंगतील,त्यानंतर विषय संपला. त्यांच्या पुतण्याचे लग्न असल्याने ते आजच्या बैठकीला उपस`थित राहिले नाहीत. याबाबत फोनवर त्यांच्याशी चर्चा झाली आहे,अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांच्यावर प्रतिक्रीया व्यक्त केेली.