कामशेत (पुणे) : कामशेत हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रामध्ये सुमारे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा दुपारच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. २) रोजी एक अनोळखी इसम इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. तो मयत झाला आहे. या अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे काम कामशेत पोलिस करीत आहेत.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून त्याच्या छातीवर डाव्या बाजूस बदामामध्ये इंग्रजी अक्षरातील ''v'' गोंदलेले आहे. तसेच दोन्ही हातावर गोंदलेले आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा व अपदा मित्र मावळचे सागर कुंभार, गणेश फाळके, सोन्या वाडेकर, आनंद शिर्के, अनिल आंद्रे यांना यश आले.