लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : पुणे येथील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या मागील पाच ते सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नामुळे महाबळेश्वर येथील स्कंधपुराणात उल्लेख असलेल्या व याच गुहेमध्ये बसून ऋषीमुनींसह देवादिकांनी तप साधना केली असल्याचे तसेच त्यांच्याच साधनेमुळे निर्माण झालेल्या वेदगंगा नदीचा शोध लावत मोठी उपलब्धी झाली आहे.मागील सहा महिन्यांपूर्वी दुर्गप्रेमी संस्थेचे पदाधिकारी श्रीनाथ शिंदे यांना पुस्तक वाचनाचा छंद असल्याने त्यांना १९०२ मध्ये दत्तात्रय दीक्षित यांनी लिहलेले महाबळेश्वर नावाचे पुस्तक वाचनात आले. यामध्ये महाबळेश्वर शहराची उत्पत्ती कशी झाली याविषयी माहिती मिळाली, यावरून संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करून या पुस्तकामध्ये उल्लेख असलेल्या प्राचीन गुहा तसेच यज्ञाप्रसंगी वेदगंगेच्या निर्मितीच्या ठिकाणाचा शोध घेण्याचे ठरले. यात महाबळेश्वर देवस्थानचे काही पुजारी तसेच स्थानिक गिर्यारोहक व जीपीएसच्या साह्याने तसेच स्थानिकांच्या मदतीने किंवा त्यांच्याकडून माहिती घेऊन येथील तीन गुहेंचा शोध लावला. तसेच शेजारूनच वाहात असलेल्या वेदगंगेच्या उगमाचे ठिकाण व ऋषीमुनींनी केलेल्या यज्ञाची जागा खोदकाम करून शोधून काढण्यात आली. या पुस्तकातून मिळालेल्या माहितीनुसार या तीन गुहा स्कंध पुराणातील उल्लेखानुसार या ठिकाणी तीन ते चार लोक बसून तप करू शकतो, अशा जागा आहेत व यापूर्वी तसेच या पुस्तकातून ईश्वरी अंश येऊन तप केल्याचा उल्लेख आढळतो. या शोध मोहिमेमध्ये दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेचे संस्थापक सुनील पिसाळ, सदस्य श्रीनाथ शिंंदे, हेमंत रामटेके, अमोल पिसाळ, रवींद्र गायकवाड, गोपाल भंडारी यांंनी काम केले.
प्राचीन काळातील गुहा व वेदगंगा नदीचा शोध
By admin | Published: June 10, 2017 2:14 AM