शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

...आणि सायकलवरून निघाली ‘पर्यावरण वाचवा’ची विज्ञानवारी!

By admin | Published: March 05, 2017 4:12 AM

सन २०१०मध्ये रात्रपाळीला जाताना त्यांचा अपघात झाला. हात, पाय, कंबर व पाठीचे मणकेदेखील या अपघातात मोडले. पाठीत दोन स्टिल पट्ट्या, पाच स्क्रू टाकून शस्त्रक्रिया केली.

- अशोक खरात,  खोडद

सन २०१०मध्ये रात्रपाळीला जाताना त्यांचा अपघात झाला. हात, पाय, कंबर व पाठीचे मणकेदेखील या अपघातात मोडले. पाठीत दोन स्टिल पट्ट्या, पाच स्क्रू टाकून शस्त्रक्रिया केली. नंतर ते १० महिने घरात पडून होते. नंतरचे ३ वर्षे जमिनीवर बसता येत नव्हते. अखेर १ वर्षानंतर वॉकर व काठी, मग लेडिज सायकलने कामाला जाऊन स्थिरावलेला भोसरी (पुणे) येथील अवलिया आज ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश सायकलवरून भ्रमण करत देत आहे.प्रकाश काशीराम पाटील (वय ६०) असे त्या विज्ञानप्रेमीचे नाव असून, नुकत्याच खोडद येथे झालेल्या विज्ञानदिनानिमित्त ते भोसरी ते खोडद (ता.जुन्नर) असा एका दिवसाचा १५५ कि.मी. सायकल प्रवास करून त्यांनी जीएमआरटीमधील विज्ञान प्रदर्शनात आलेल्या विज्ञानप्रेमींना ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश जीएमआरटीच्या परिसरात २ तास सायकलिंग करून दिला. आतापर्यंत त्यांनी १६ हजार किलोमीटर सायकलवरून प्रवास केला आहे.या वेळी जीएमआरटीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व विज्ञानप्रेमींनी प्रकाश पाटील यांचे या सायकल अभियानाचे कौतुक केले. दररोज सायकल चालविण्याचा छंद जोपासला. त्यामुळे कोणतच अंतर पाटील यांना लांब वाटलं नाही. २०१३ व २०१४मध्ये दक्षिण भारत दोन वेळा सायकलप्रवास करून धनुष्येकोडी, रामेश्वरमपर्यंत ‘बेटी बचाव’ अभियान करून एक माणुसकीचा अनोखा संदेशदेखील दिला. त्याच सायकलने तिरुपती बालाजी, हंपीचा प्रवास केला. नंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी या राज्यांचाही सायकलवरून प्रवास केला.‘पर्यावरण बचाव’ व ‘बेटी बचाव’चां संदेश देताना सायकलवर त्या आशयाचे लोगो व स्टिकर्स लावले आहेत व परिधान केलेल्या कपड्यांवर इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा, बेटी वाचवा असे संदेश लिहिलेले आहेत.