...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 19:48 IST2019-03-23T16:50:01+5:302019-03-23T19:48:14+5:30
महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण हे कधीही न फिटणारे आहेत.

...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे !
पुणे: पुणे-आळंदी मार्गावरून शिवजयंती निमित्त काही शिवप्रेमी तरुण रस्त्यावरुन शिवज्योत घेवून धावत होते. त्याचवेळी छत्रपती संभाजी मालिकेत संभाजीराजांची भूमिका साकारत असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे तिथून जात होते. त्यांनी हे चित्र पाहताच आपली गाडी थांबवत गाडीमधून उतरले. ते काहीवेळ ज्योत घेवून तरुणांसोबत धावले. आणि पुन्हा आपल्या पुढील कामासाठी निघून गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे-आळंदी मार्गावरून काही तरुण तिथीनुसार साजरी होत असलेल्या शिवजयंतीनिमित्त शिवज्योत घेवून शिवप्रेमी तरुण जात होते.त्याचवेळी डॉ. कोल्हे हे आपल्या नियोजित कामासाठी तिथून जात होते. त्यावेळी त्यांनी हे दृश्य पाहिले. आणि गाडी थांबवत ज्योत स्वत:कडे घेत काही अंतर धावले.
....................
महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण हे कधीही न फिटणारे आहेत. या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी शिकवलेला अभिमान आणि स्वबळावर विश्वास यांवर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. माझ्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: नमन करतो. - डॉ अमोल कोल्हे.