पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेसवर खंडाळा घाटाजवळील बायबास येथे गाडीतून धूर निघत असल्याने चारचाकी चालकाने गाडी बाजूला घेतली. गाडीतून धूर निघत असल्याने गाडीतील कुटुं घाबरुन गेले हाेते. कुठल्याहीक्षणी गाडी पेट घेऊ शकली असती. इतक्यात मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या संजय जाधव या अग्निशमन जवानाच्या निदर्शनास ही बाब अाली. त्यांनी लगेच अापली गाडी बाजूला घेत गाडीतील अग्निराेधक उपकरण घेत रस्ता अाेलांडला अाणि गाडीला लागलेली अाग विझवत, अापली कर्तव्यतत्परता दाखवली. त्यांच्या या प्रसंगावधानाचे सर्वांनीच काैतुक केले. पुण्यातील लाेहियानगर येथील अग्निशमन केंद्रात संजय जाधव हे फायरमन म्हणून कार्यरत अाहेत. गुरुवारी ते अापल्या वयक्तिक कामासाठी मुंबईला गेले हाेते. दुपारी 3.15 च्या सुमारास पुण्याला परतत असताना त्यांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीतून धूर येत असल्याचे तसेच नागरिक अारडाअाेरडा करत असल्याचे दिसले. त्यांनी लगेच गाडी बाजूला घेत अापल्या गाडीत असलेले अग्निराेधक उपकरण घेऊन त्या गाडीची अाग विझवली. त्याचबराेबर अाग पसरु नये म्हणून त्यांनी त्या गाडीत असलेल्या पाण्याचा मारा अागीवर करुन अाग नियंत्रित अाणली. झायलाे ही गाडी गुजराती पासिंगची हाेती. त्यात दाेन कुटुंबे प्रवास करीत हाेती. त्याचबराेबर या कुटुंबामध्ये 4 लहान मुलं देखील हाेती. संजय जाधव यांनी प्रसंगावधान दाखविला नसता तर अनर्थ घडला असता. त्यांच्या या प्रसंगावधानाचे सर्वांकडून काैतुक करण्यात येत अाहे.
...अाणि त्यांनी दाखवली अापली कर्तव्यतत्परता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 6:55 PM