शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

...आणि तासात झाले उरुळी कांचन, सासवड शहर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:47 PM

‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने.

उरुळी कांचन : ‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने. फक्त एका मोबाइलच्या मेसेजवर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी उपस्थित होऊन गावाची स्वच्छता केली.संत तुकाराममहाराज पालखी प्रस्थानानंतर गावामध्ये झालेला कचरा घाण साफ करण्यासाठी येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला मंडळे, गणेश मंडळे, गाव पुढारी इत्यादींना आवाहन केले होते. त्याप्रमाणे मंगळवारी (दि. १०) गावातील पालखी मार्गावर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या सातत्याचे हे तिसरे वर्ष आहे.संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे आला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, खासगी व सामाजिक संस्था वारकºयांसाठी चहा, बिस्किटे, फळे, अल्पोपहार, जेवण देतात व त्यामुळे परिसरात कचºयाची प्रचंडप्रमाणात वाढ झाल्याने गावाची आरोग्यसमस्या वाढते.यावर उपाय म्हणून उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी , निसर्गोपचार आश्रम ट्रस्ट, साईनाथ मित्र मंडळ, शौर्य करिअर अ‍ॅकॅडमी, शिक्षणा फाउंडेशन, पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेज यांनी स्वच्छता मोहिमेत सर्वांनी हातात झाडू घेऊन सहभागी होऊन गावातील आश्रम रोड, मुख्य बाजारपेठ, महात्मा गांधी रोड, तळवाडी चौक, शाळा परिसर आणि पालखी मार्गावरील दिंड्यांच्या विसाव्याची ठिकाणे स्वच्छ करत. एका तासाच्या आत पालखी गावात आली होती का नव्हती, असे वाटावे, असा परिसर स्वच्छ केला.हवेलीचे नायब तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांनी पालखीलादौंड हद्दीत पोहोचवून परत येतानागाव चकाचक पाहून या उपक्रमाचे कौतुक केले. सासवड : संत ज्ञाननेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे ९ व १० जुलै रोजी होता. १० जुलै रोजी संत सोपान व संत चांगा वटेश्वर यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला मार्गस्थ झाल्यानंतर सासवड नगर परिषदेने तातडीने सासवड येथील पालखीतळ स्वच्छ करण्यास सुरुवात केली. वारकºयांनी जेवणानंतर टाकलेले पत्रावळी, द्रोण, पाण्याच्या बाटल्या, चहाचे ग्लास, फळांच्या साली, अशा तत्सम प्रकारचा तब्बल २५ ते ३० टन कचरा यावेळी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या मदतीने संकलीत करून पालखी तळा सोबतच सासवड शहर देखील स्वच्छ केले.नगरपालिकेकडुन कचरा संकलना नंतर लगेचच शहर परिसरात जंतुनाशक पावडर टाकण्यात आली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वाहनाच्या सहाय्याने जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. नगरपालीकेच्या अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने शहरातील रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचे काम चालु आहे.पालखी सोहळ्यातील दिंड्यांना नगरपालिकेने कचरा साठवुन ठेवण्याकरिता ४०० गोण्या दिल्या होत्या. यामुळे कचरा इतरत्र टाकला न जाता त्याचे एकाच ठिकाणी सहज संकलन करता आले. नगरपालिकेचे ४ बोलेरो, २ ट्रॅक्टर, आदर पुनावाला ग्रुपचे कचरा संकलनाची ४ वाहने, पुणे महानगरपालिकेचे जंतुनाशक वाहन, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. स्वच्छता उपक्रमात सासवड नगरपालिकेस पुणे महानगरपालिका, आदरपुनावाला, थं क्रिएटीव्ह, या संस्थाचे सहकार्य लाभले, अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण व नगरसेवक अजित जगताप व संदिप जगताप यांनी दिली.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा