शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

..अन् वृक्षाच्या मुळाशी विसावल्या ‘नटसम्राटा’च्या अस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 13:34 IST

कोथरूडमध्येच वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचे फिरायला जाण्यासाठीचे आवडते ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी होती...

ठळक मुद्देडॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतिनिमित्त वृक्षारोपण; एआरएआय टेकडीवर जपल्या आठवणी 

पुणे : ज्या ‘नटसम्राटा’च्या संवादफेकीने आणि आवाजाने आपली वेगळी ओळख निर्माण केली, तसेच त्यांचं जाणं देखील प्रत्येकाच्या मनात वेदना देऊन गेली. पण हा ‘नटसम्राट’ पुणेकरांसाठी मात्र सतत ‘बहरत’ राहणार आहे. या ‘नटसम्राटा’च्या आठवणी कोथरूड येथील ‘एआरएआय’ टेकडीवर कायम जपून राहाव्यात, यासाठी तिथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षापरोण करताना मुळाशी डॉ. लागू यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या. त्यामुळे हा वृक्ष डॉ. लागू यांच्या आठवणींना उजाळा देत राहील.  ज्या ठिकाणी ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू सकाळी येऊन विश्रांती घ्यायचे, त्याच ठिकाणी हे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अजरामर झालेल्या नाटकातील प्रसिद्ध संवादाचे  स्मृतिफलकही येथे उभारले आहेत. ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांचे  एक महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि वसंत वसंत लिमये यांच्यातर्फे एआरएआय टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजिला होता. या वेळी डॉ. दीपा श्रीराम, डॉ. मोहन आगाशे, प्रा. श्री. द. महाजन, सतीश आळेकर, वसंत वसंत लिमये, श्रीरंग गोडबोले, चंद्रकांत काळे, नंदा पैठणकर, सुनील बर्वे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, सुनीती जैन, डॉ. प्रभा गोखले, विभावरी देशपांडे, माधुरी सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. गौरी लागू यांनी सूत्रसंचालन केले.........काव्यातून डॉ. लागू यांच्या आठवणींना उजाळा नाटकातील शब्दांवर जसे डॉ. लागू यांचे प्रेम होते तसेच कवितेवरही होते. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांच्या आवडत्या कविता आणि नाट्यांश सादर केले. त्यामुळे उपस्थित डॉ. लागूंच्या आठवणींमध्ये रमले. या भावस्पर्शी कार्यक्रमास अनेक नाट्यप्रेमी आणि टेकडीप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली..........‘मृत्यूची भीती तर माणसाला नसावीच, ज्याला थोडंसुद्धा चांगलं काही करायचं आहे. तो स्वत:ला फक्त एकच प्रश्न विचारू शकतो. मी करतोय ते चांगलं का वाईट ? बास! त्यानं मृत्यूची गणितं मुळी मांडताच कामा नयेत.’ हे मकरंद साठे लिखित ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकातील संवाद  फलकावर अनेकांना प्रेरणा देत राहील. ..........‘ज्योतीनं आंतर-जातीय लग्न केलं आणि आज खऱ्या अर्थानं आपण जातपात तोडली आहे. माझं घर खऱ्या अर्थानं भारतीय बनलं आहे. त्यामुळे आपण फार खुशीत आहोत आज ! मीच नवा झालो आहे!’’ हे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘कन्यादान’ नाटकातील शब्द स्फूर्तीदायक आहेत. .......‘‘जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळयाशार डोहामध्ये ? आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा यांचा आणि त्याचाही !’’ हे वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ मधील प्रसिद्ध संवाद आहे. ........ते बाकडे म्हणजे डॉ. लागूंची आठवण कोथरूडमध्येच वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचे फिरायला जाण्यासाठीचे आवडते ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी होती. येथील एका बाकावर ते बसलेले असल्याचे अनेकांनी पाहिलेले आहे. याच ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या अभिनय कारकिर्दीस मानाचा मुजरा करण्यासाठी स्मृतिवृक्ष लावण्यात आला. ‘नाटककाराचा माल प्रेक्षकांकडे नेऊन टाकणाऱ्या एखाद्या लमाणाप्रमाणे आयुष्य माझे...’ हे ‘लमाण’मधील वाक्य या फलकावर लिहिले आहे. डॉ. लागू यांच्या विविध नाटकातील गाजलेली वाक्ये आणि त्याच नाटकातील भावमुद्रा असलेले फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. 

टॅग्स :kothrudकोथरूडShriram Lagooश्रीराम लागूMohan Agasheमोहन आगाशेTheatreनाटक