शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

...अन् महापालिका तरली!

By admin | Published: April 15, 2015 12:44 AM

वाढलेली थकबाकी यामुळे २0१४-१५ या आर्थिक वर्षात तब्बल अडीचशे ते तीनशे कोटींच्या तुटीकडे झुकलेले अंदाजपत्रक तरले आहे.

सुनील राऊतल्ल पुणे बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी, स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) घटलेले उत्पन्न आणि पाणीपुरवठा तसेच मिळकतकराची वाढलेली थकबाकी यामुळे २0१४-१५ या आर्थिक वर्षात तब्बल अडीचशे ते तीनशे कोटींच्या तुटीकडे झुकलेले अंदाजपत्रक तरले आहे. महापालिका प्रशासनाच्या अंदाजानुसार, या अंदाजपत्रकात केवळ १0 कोटींची तूट येणार आहे. ३२२६ कोटी ३0 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून, ३२३६ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीने तब्बल ४ हजार १५0 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, या आर्थिक वर्षात राज्य शासनाने एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्याने महापालिकेस मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्याचे दिसू लागले होते. त्यातच बांधकाम क्षेत्रातही मंदी आल्याने या विभागाकडून मिळणा-या उत्पन्नातही मोठी घट आली आहे. मिळकतकर विभागास उद्दिष्टही गाठता आले नाही. ४महापालिका प्रशासनाने काढलेल्या प्राथमिक अंदाजपत्रकात केवळ १० कोटींची तूट प्रशासनास अपेक्षित आहे. त्यानुसार, ३१ मेअखेर पालिकेच्या तिजोरीत २९०३ कोटी रुपये जमा असून, महापालिकेस बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, १९० कोटी रुपये पालिकेच्या खात्यात विविध विभागांचे शुल्क, कर तसेच पालिकेची येणी जमा झालेली आहेत. तर मुद्रांक शुल्काच्या हिश्श्यापोटी १३५ कोटी रुपये राज्यशासनाकडून मिळाले आहेत. त्यामुळे पालिकेची या अंदाजपत्रकाची जमा ३२२६ कोटी ३० लाख रुपयांची आहे.४तर ३० मार्चअखेर महापालिकेचा महसुली खर्च १५९५ कोटी ६१ लाख, पीएमपीसाठी १५९.६२ कोटी, तर भांडवली खर्च ९५४.३४ कोटींचा झालेला आहे. तर याच दिवसाअखेरीस २३० कोटींची बिले आली असून खात्यांकडे २२२.१८ कोटींची बिले आहेत. याशिवाय पूर्वीची ७५ कोटींची अखर्चित बिले असा एकूण ३२३६.८५ कोटींचा खर्च प्रशासनास अपेक्षित आहे. हा जमा आणि खर्चाचा आकडा पाहता प्रशासनाला केवळ १० कोटींची तूट येणार आहे.४मागील वर्षीची मोठ्या प्रमाणातील विकासकामे अर्धवट राहिल्याने या कामांना मुदतवाढ देण्याची मागणी स्थायी समितीसह नगरसेवकांनी केली होती. मात्र, जमा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही मुदतवाढ देण्यास असहमती दर्शविली होती. तर प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात स्थायी समितीने प्रशासनाचा निषेध करून सभा तहकूब केली होती. त्या वेळी उत्पन्न आणि खर्चाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, आता अंदाजपत्रकाचा ताळमेळ साधल्याने प्रशासनास ठराविक कामांना मुदतवाढ देणे शक्य आहे. उत्पन्न नसताना खर्चाचा बोजा ४पालिकेच्या उत्पन्नाचा आकडा एवढ्या मोठ्या प्रमाणात असला तरी, आर्थिक संकटामुळे प्रशासनाकडून केवळ ३ हजार कोटींचेच उत्पन्न मिळण्याचे संकेत दिले जात होते. मात्र, दुसरीकडे याच आर्थिक वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा आचारसंहिता असतानाही, लोकप्रतिनिधींच्या आग्रहाने महापालिका प्रशासनाने तब्बल साडेबारा हजार निविदा काढल्या होत्या. तसेच यातील जवळपास सर्वच कामे सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चाचा बोजा जास्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते.खर्च महसूली खर्च 1595. 61 कोटी पीएमपी 159.62 कोटी भांडवली 954.34 कोटी आवक बिले 230 कोटीखात्याकडील बिले 222.18 कोटी पूर्वीची अखर्चित बिले 75 कोटी एकूण 3236.85 कोटी