पुणे : गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्दो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात जिवंत झाली. यामध्ये 'महाराष्ट्रीयन स्त्री', 'द स्क्रीम' (किंकाळी) अशा प्रकारच्या अनेक कलाकृतींचा समावेश होता. एरवी गाजलेली चित्र पाहणाऱ्या रसिकांना, विद्यार्थ्यांना आगळा वेगळा जिवंत कलाकृतींचा अनुभव मिळाला... आर्ट स्कूलचे विद्यार्थीच चित्राची भूमिका घेऊन सजीवपणे उभे होते !निमित्त होते, वार्षिक ‘आर्ट वॉक अॅण्ड ग्राफिटी वॉल २०१७-२०१८ प्रदर्शनाचे’. 'महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संचालित 'स्कूल आॅफ आर्ट अॅण्ड आर्ट अॅकॅडमी'च्या वतीने ही नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आली होती.या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. सी. ई. सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून चेहऱ्यावर रंगभूषा करून गाजलेल्या चित्रकारांच्या चित्रांना जिवंत रूप दिले होते. त्यात ऋषिकेश कुचेकर, गणेश आर. पै, शाहीन मिसाळ, क्षितिजा शहा या विद्यार्थ्यांनी चित्रस्वरूप भूमिका केल्या. आकाश लष्करे, अमित ढावरे, शाहीन इनामदार, मंदार जोशी, ओमकार पवार या विद्यार्थ्यांनी रंगभूषा केली होती. अशा स्वरूपातील प्रदर्शनाची प्रा. महेश निरंतरे आणि कपिल अलास्कार यांची मूळ संकल्पना होती. सुभाष खंडाळे, भारत लोंढे आणि हेमा जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदुम, सहसचिव इरफान शेख, ‘स्कूल आॅफ आर्ट अॅण्ड आर्ट अॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन, प्राध्यापक-शिक्षक वर्ग उपस्थित होता.
...अन् गाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली जिवंत...!; पुण्यात अनोखे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 1:27 PM
गणपतराव म्हात्रे, पाब्लो पिकासो, एडवर्ड मूंच, वैन गो, साल्व्हादोर दाली, फ्रीडा काहलो, लिओनार्दो व्हिन्सी या चित्रकारांची पारंपरिक चित्रे प्रदर्शनात जिवंत झाली.
ठळक मुद्देअतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. टी. एस. भाल यांच्या हस्ते झाले प्रदर्शनाचे उद्घाटन चित्र पाहणाऱ्या रसिकांना, विद्यार्थ्यांना मिळाला आगळा वेगळा जिवंत कलाकृतींचा अनुभव