शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

...आणि ‘ती’ बोहल्यावरून पळून गेली

By admin | Published: November 18, 2016 5:54 AM

वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले.

मंचर (जि.पुणे) : वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले. लग्नाचे विधीही सुरू झाले. अखेर अल्पवयीन वधूने १०० नंबरवर संपर्क साधून हा प्रकार पोलिसांना कळविला. मात्र हे कळताच विधी उरकण्याची लगबग सुरू झाली. हार घालण्याची बळजबरी होताच ती बोहल्यावरून पळाली. ही घटना आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी मुलीचे आई, वडील, मध्यस्थ, मुलगा व त्याचे आई वडील अशा सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीने स्वत: फिर्याद दिली आहे. हातावर पोट असलेल्या तिच्या आई-वडिलांनी नागापूर येथील लक्ष्मण गायकवाड यांचा मुलगा पंकेश याच्याबरोबर तिचा विवाह निश्चित केला होता. दसऱ्याला टिळा लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिने कायद्यानुसार वय कमी असल्याने माझा विवाह करु नका, असे आई-वडिलांना समजावून सांगितले. परंतु, आपली परिस्थिती गरिबीची आहे. समोरील लोक सर्व खर्च करणार आहेत, तेव्हा तू गप्प राहा, अशी तिची समजूत घालण्यात आली. आज तिचा विवाह समारंभ होता. दुपारी लग्न होण्यापूर्वी तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून मंचर पोलीस ठाण्यात १०० क्रमांकावर संपर्क साधला आणि माहिती दिली. दरम्यान, पोलीस येत असल्याचे कळताच लग्नाचा विधी लवकर करण्याचे ठरले. मुलाच्या गळ्यात हार घाला,असे म्हणताच या बहाद्दर मुलीने पळ काढला. तिचे होणारे सासरे तिच्या मागे पळत आले. त्यांनी आम्ही खर्च केला आहे, तू लग्न कर, असे सुनावले. मात्र ती बधली नाही. (वार्ताहर)