शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

आणि.. ‘ ते ’ ही पडले बारामतीच्या प्रेमात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:08 PM

बारामती परिसराला आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या देशातील राष्ट्रीय नेत्यांनी अलीकडील काही वर्षांत भेटी देऊन पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आता..

ठळक मुद्देबारामती येथील कृषी विज्ञान केंद्र देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांसाठी रोल मॉडेल देशातील शेतकऱ्यांपुढे आणि शेतीसमोर आव्हाने भरपूर शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे येथील ग्रामीण भागाचा कायापालट

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना देखील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीची भुरळ पडली आहे. उपराष्ट्रपती नायडू यांनी येथील कृषी विज्ञान केंद्रासह विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपतींनी या संस्थांचे कौतुक केले.बारामती परिसराला आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या देशातील राष्ट्रीय नेत्यांनी अलीकडील काही वर्षांत भेटी देऊन पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आता उपराष्ट्रपतींनी देखील आज पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी येथे भेट दिली.यावेळी पत्रकारांशी बोलताना उपराष्टपती व्यंकय्या नायडू म्हणाले, की आज माझ्यावर उपराष्ट्रपती म्हणून घटनात्मक जबाबदारी आहे. पूर्वी मी सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष असताना जे करायचे ते बोलू शकत होतोे. पण या पदावर आल्यापासून कृतीतून त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याचे काम करत आहे. उपराष्ट्रपती म्हणून मला केवळ बसून राहायचे नाही. त्यामुळे मी भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांना भेट देत आहे, माहिती घेत आहे. सर्व राज्यांत जाऊन तेथील तरुण पिढीला राष्ट्रप्रेम, भारताचा ऐतिहासिक ठेवा व त्याचे महत्त्व, संस्कृतीची माहिती देऊन हा ठेवा जपण्याचे आवाहन करत आहे.येथील कृषी विज्ञान केंद्र, विद्या प्रतिष्ठानचे उपराष्ट्रपतींनी कौतुक करताना ज्येष्ठ नेते शरद पवार, कै . अप्पासाहेब पवार, अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांची देखील स्तुती केली. नायडू म्हणाले, की येथील कृषी विज्ञान केंद्र देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांसाठी रोल मॉडेल आहे. आज ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात असा बदल पाहायला मिळाल्याचे समाधान आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारे संशोधन या ठिकाणी करण्यात आले आहे. हे काम पाहून प्रभावित झालो आहे. देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी भेट देऊन तेथील संशोधनाची माहिती घ्यावी. कृषी विस्तार क्षेत्रात सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी काम करण्याची गरज आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनेही संशोधनात मूलभूत काम केले आहे. देशातील शेतकऱ्यांपुढे आणि शेतीसमोर आव्हाने भरपूर आहेत. मात्र, त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी येथे संशोधन क्षेत्रात होत असलेले काम मूलभूत स्वरूपाचे आहे. सर्व संसद सदस्यांना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून बारामतीमध्ये भेट देण्यासाठी सांगणार आहे, असे नायडू म्हणाले.या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते..............................पार्श्वभूमी ग्रामीण असल्यामुळे आमचा स्नेह जुळलाशरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे येथील ग्रामीण भागाचा कायापालट झाला. आमच्या दोघांचीही पार्श्वभूमी ग्रामीण असल्यामुळे आमचा स्नेह जुळला. माझ्या राजकीय जीवनाच्या प्रारंभापासून ज्येष्ठ नेते पवार यांच्याशी माझे वेगळे संबंध आहेत. आमचे राजकीय विचार वेगळे असले, तरी ग्रामीण विकासाबाबत त्यांचे प्रेम, त्यांचा दृष्टिकोन  आणि सतत ज्ञान संपादन करण्याची सवय यांमुळे आमची मैत्री कायमच राहिली, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी असलेले स्नेहबंध उलगडले.०००...उपराष्ट्रपतींचा नोंदवहीत अभिप्रायउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, संग्रहालयाला भेट दिली. या वेळी नायडू यांनी संग्रहालयात पवार यांना विविध ठिकाणांहून मिळालेल्या भेटवस्तू, त्यांची छायाचित्रे यांची पाहणी केली. त्यानंतर नायडू यांनी ‘हे संग्रहालय एक असामान्य व्यक्तिचित्रण करणारे प्रतिबिंब आहे. अतिशय मौल्यवान असा हा ठेवा असून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो जतन करण्यात आला आहे. नवीन पिढीला हा ठेवा निश्चित मार्गदर्शक ठरेल,’ असा अभिप्राय नोंदवहीत नोंदविला.०००...‘ लोकमत’ मध्ये योग दिनावर लिहिल्याचा उल्लेखपत्रकार परिषद पार पडल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांसह माध्यम प्रतिनिधींसमवेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छायाचित्रे काढली. त्यांनतर माध्यम प्रतिनिधींनी आपापली ओळख करून दिली. यावर आपणदेखील लिखाण करतो. ‘लोकमत’मध्ये योग दिनावर केल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी आवर्जून केला.०००

टॅग्स :BaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारagricultureशेती