पुणे : माओवादी चळवळीचा शहरी भागात प्रचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या ८ साथीदारांना अटक करणा-या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारने नुकताच गौरव केला आहे़ ही कामगिरी तत्कालीन एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने केली होती.मुख्य आरोपी कृष्णा लिंगय्या उर्फ अजय उर्फ महेश लिंगप्पा घोषका उर्फ हरीष उर्फ सी अनिल लिंगप्पा उर्फ वेणुगोपालम उर्फ वेणु वेलगोटा याच्यावर आंध्र प्रदेश सरकारने २०१२ मध्ये तब्बल ८ लाखाची बक्षीस जाहीर केले होते़ त्याच्या बरोबरच इतर ७ आरोपींना एटीएसने मुंबईच्या विविध भागातून २०१८ मध्ये अटक केली. अटक केलेले सर्व आरोपी कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (माओवादी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, बेकायदेशीर कृत्य करून देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वास धोका उत्पन्न करत असल्याचे तपासाअंती निदर्शनास आल्यामुुळे त्यांच्याविरुद्ध दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपींनी २००७ पासून गुजरातचा काही भाग, नाशिक , औरंगाबाद, मुंबई, पुणे या शहरी भागामध्ये नक्षलवादी चळवळीची विचारसरणी राबविण्याचे काम सुरु केले. मुख्य सूत्रधार कृष्णा लिंगय्या हा वेगवेगळी नावे धारण करून दहा वषार्पांसून भूमिगत राहून गुंगारा देत होता. त्याच्यावर गुजरात व आंध्र प्रदेशात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्यावर नक्षल चळवळीतील रँक नुसार बक्षीसे घोषित करण्यात आले होते.आंध्र प्रदेश सरकारने एटीएसच्या कामगिरीची दखल घेऊन पोरितोषिकाचा डिमांड ड्राफ्ड पोलीस महासंचालकांच्या नावाने पाठविला आहे़ तो स्वीकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे़पारितोषिक जाहिर झालेले अधिकारी व कर्मचारीपोलिस उपायुक्त डॉ. मोहन कुमार दहिकर , सहाय्यक आयुक्त सुनील वाडके, पोलीस निरीक्षक संजय एस मराठे, निरीक्षक भास्कर डी. कदम, निरीक्षक संतोष डी. सावंत, सहाय्यक निरीक्षक दशरथ एम विटकर, उपनिरीक्षक विक्रम ए. पाटील, हवालदार अरुण बी. देशमुख, अरविंद एस. मोरे, शहाजी एन. सोनावने, राजेंद्र ए. खरात.
महाराष्ट्र एटीएसच्या शौर्याचा आंध्र प्रदेश सरकारकडून गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 4:53 AM