पुणे : जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे कामकाज अधिक वेगवान करण्यासाठी तसेच कामे पेपरलेस करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या ‘सही पोषण, देश रोशन’ उपक्रमांतर्गत ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातूनच संबंधित अंगणवाडीसेविका व मदतनीस या नोंदी ठेवू शकणार आहेत. यासाठी अंगणवाडीसेविका व मदतनिसांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून, ३० मेपर्यंत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या २०० मोबाईल सेविकांना देण्यात आले असून, याद्वारे हे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे लवकरच जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. जिल्ह्यात जवळपास ४ हजार ६०२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांचे काम वेगवान करण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘आयसीडीएस सीएएस’ या मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकाºयांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सध्या २०० मोबाईल राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्यात आले असून, येत्या काळात सर्व अंगणवाडीसेविका आणि कर्मचाºयांना मोबाईलचा ऑनलाइन यंत्रणेसाठी कसा वापर करायचा यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘जून महिन्यापासून सर्व अंगणवाड्यांचा कारभार हा ऑनलाईन नोंदीद्वारे चालूणार आहे. यामध्ये लसीकरण, गृहभेटी, बालकांच्या दैनंदिन नोंदी, स्तनदा माता, गरोदरमाता आणि मुलींच्या आरोग्याच्या नोंदींचा समावेश असेल. प्रत्येक सेविकेला मोबाईलमध्ये ह्यकॉमन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरह्ण (कॅस) या अॅपद्वारे माहिती भरता येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान मोबाईलमधील अॅप आणि सिमकार्ड सुरू करण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत आहेत. या पुढे अंगणवाडी सेविकांना आता रजिस्टर हाताने लिहिण्याची गरज राहणार नाही. या प्रशिक्षणानंतर त्या कर्मचाºयांना स्मार्टफोनमधील अॅपद्वारे माहिती द्यावी लागणार आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.प्रशिक्षणानंतर मोबाईल अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. या द्वारे बालकांची दैनंदिन माहिती त्यांना मोबाईलद्वारे अपडेट करावयाची आहे. हा मोबाईल कसा हाताळावा यासाठी हे प्रशिक्षण आहे. दैैनंदिन माहिती भरताना तसेच मोबाईल सांभाळताना सेविकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
.............. जिल्ह्यातील अंगणड्यांच्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण सुरुवात झाली आहे. त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हाताखालील सेविकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. प्रत्येक तालुक्यात टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यवेक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रातिनिधिक अंगणवाडी सेविका असे एकूण सुमारे दोनशे जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण लोणावळा येथे सुरू आहे. ज्यांना स्मार्ट फोन वापरता येत नाही त्यांच्या आवाजावरून (व्हाइसद्वारे) देखील रेकॉर्डची माहिती भरली जाणार आहे. - दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.