खेड : आपल्या विविध मागण्यांसाठी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आरोग्य परिचारिका, आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी मदतनीस यांच्यातर्फे विविध मागण्यांसाठी तसेच हक्कांसाठी मंगळवारी (दि.८) खेड पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी खेड तहसीलसमोर धरणे देत महिलांनी ठिय्या दिला.
अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका, आरोग्य परिचर, आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी मदतनीस यांच्या विविध मागण्या सरकार मान्य करीत नाही. मागण्या मान्य होण्यासाठी यापूर्वीही अनेकदा आंदोलने केली. मात्र, सरकारला त्यांच्या मागण्यांचा आणि आश्वासनांचा विसर पडल्याने अंगणवाडी सेविकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा राज्यव्यापी आंदोलन केले. या आंदोलनाचा भाग म्हणून खेड, आंबेगाव, जुन्नर येथील अंगणवडी सेविका आणि कर्मचाºयांनी खेड तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. केंद्र सरकार सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग देते तर खºया अर्थाने सेवा देणाºया या कर्मचाºयांना त्यांच्या विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने मोर्चे काढावे लागत आहेत. हे दुर्दैव असल्याच्या भावना व्यक्त करून या कर्मचाºयांनी जोरदार घोषणा देत तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे धरले.
अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाºयांच्या संघटनेचे निमंत्रक नीलेश दातखिळे, महिला जिल्हाध्यक्ष सविंद्रा बोºहाडे यांच्या नेतृत्वाखाली राजगुरुनगर शहरातून पंचायत समिती व खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन करण्यात आले. जवळपास २० मिनिटे धरणे धरल्यानंतर अधिकारी संजय दुधाळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आंदोलनानंतर खेड तहसीलदार कार्यलयावर नेण्यात आला. मोर्चाचे रूपांतर येथे सभेत झाले. तहसीलदार सुचित्रा आमले यांना मागण्याचे निवेदन देण्यातआले. येत्या २२ जानेवारी रोजी आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर ११ ते १३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.मोर्चात सहभागी....किमान वेतन लागू करावे, सरकारी वैद्यकीय क्षेत्राचे खाजगीकरण नको, कंत्राटी पद्धत बंद करा, योग्य आर्थिक मोबदला मिळावा यासारख्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यात अंगणवाडी सेविका, आरोग्य परिचर, आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी मदतनीस यांच्याविविध मागण्यासाठी आज खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आरोग्य परिचर, आशा वर्कर, गटप्रवर्तक, अंगणवाडी मदतनीस अशा शेकडो महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला.