एमपीएससी स्टुडंट्स राईट्स या विद्यार्थी संघटनेचे किरण निंभोरे यांनी सांगितले की, परीक्षेच्या तारखा जाहीर होत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी नैराश्यात आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या आमच्या बांधवांना आत्महत्या करावी लागत असेल तर शासनाला जड जाईल. असेच होत राहिल्यास विद्यार्थी राज्यात मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही.
चौकट
सरकारला जागे करण्यासाठी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही परीक्षा झाली नाही. त्यामुळे राज्य शासनाला जागे करण्यासाठी येत्या रविवारी (दि.४) सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ट्विटर मोहीम राबविली जाणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी, रखडलेल्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे, रखडलेल्या सर्व नियुक्त्यांचा तिढा लवकर सोडवावा, नवीन जागांच्या जाहिरातीचे वेळापत्रक प्रसिद्ध करावे, या मागणीसाठी ही मोहीम राबवणार असल्याचे एमपीएससी समन्वय समितीने सांगितले.