पुणे : अनिल कुमार लाहोटी हे मध्य रेल्वेचे नवे सरव्यवस्थापक नियुक्त झाले असून, त्यांनी शुक्रवारी आपला पदाचा स्वीकार केला. ते यापूर्वी उत्तर रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) या पदावर कार्यरत होते. ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्स (IRSE) चे १९८४ च्या बॅचचे अधिकारी असून आयआयटी रुड़की (पूर्वीचे रुड़की विद्यापीठ) मधील मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (स्ट्रक्चर्स) ही पदवी संपादन केली आहे.
अनिल कुमार लाहोटी यांना रेल्वेमध्ये विविध विभागाचा अनुभव आहे. मध्य रेल्वेमध्ये सुरूवातीला रूजू झाल्यावर त्यांनी नागपूर, जबलपूर (आता पश्चिम मध्य रेल्वेवरील), भुसावळ विभाग आणि मध्य रेल्वे मुख्यालय येथे १९८८ ते २००१ पर्यंत विविध पदांवर काम केले. त्यांनी सदस्य इंजिनियरिंग, रेल्वे बोर्ड यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून देखील काम केले आहे तसेच मुख्य अभियंता (निर्माण), उत्तर रेल्वे; कार्यकारी संचालक (ट्रॅक मशीन्स), रेल्वे बोर्ड आणि उत्तर मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे.