रवंथ करणाऱ्या प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. कोणत्याही घटक पदार्थाचे प्रमाण वाढल्यास जनावरांना अपचनाचा, पोटशूळीचा त्रास होण्याची शक्यता असते. जनावरांना नुसती पेंड खाऊ घातली तरी त्रास होण्याची शक्यता असते. वैरण, हिरवा चारा, पेंड याबाबतचे प्रमाण ठरवण्याची गरज असते. नियमित तपासणी आणि सकस आहार जनावरांसाठी आवश्यक असल्याचे मत पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखी सोहळ्यातील ‘हिरा’ हा अश्व आळंदीपासून आजारी होता. उपचार सुरू असताना तो पालखीबरोबर पुण्याकडे निघाला होता. मात्र, पुण्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला पोटशूळ या आजाराचे निदान झाले. पालखी सोहळ्यातील बैल व घोडे यांची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पशुसंवर्धन पथकाची स्थापना करण्यात येते. यंदाच्या पथकात खेड व हवेली या दोन तालुक्यातील अधिकाºयांचा समावेश आहे. आळंदी येथे खेडमधील पथकाने या अश्वावर उपचार केले होते. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली होती. पुण्यात भवानी पेठ येथे आल्यानंतर हवेली तालुक्यातील ललिता गावडे यांच्या पथकाने अश्वावर उपचार केला. वर्षभर आराम करणाºया प्राण्यांना दूर अंतर चावण्याची सवय नसते. आळंदी ते पुणे हे अंतरही मोठे आहे. अचानक गर्दीमध्ये चालण्याचीसुद्धा त्यांना सवय नसते. त्यामुळे हे प्राणी घाबरून जातात. तसेच या अश्वाला पोटशूळ (कोलिक) हा पोटाचा आजार होता. चुकीचे पदार्थ पोटात गेल्याने त्याचे पोट फुगलेले दिसत होते. शनिवारी रात्री १२ वाजता या अश्वावर उपचार करण्यात आले होते. रविवारी सकाळी तो उठून उभा राहिला होता. मात्र, काही वेळानंतर तो जमिनीवर कोसळला त्यानंतर मृत्यू झाला. रवंथ करणाºया प्राण्यांना पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास त्रास होतो. पिष्टमय पदार्थांप्रमाणेच कर्बोदके, फायबर हे घटक पदार्थही मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करावे लागतात. कोणत्याही घटक पदार्थाचे प्रमाण वाढल्यास जनावरांना अपचनाचा, पोटशूळीचा त्रास होण्याची शक्यता असते. जनावरांना नुसती पेंड खाऊ घातली तरी त्रास होण्याची शक्यता असते. वैरण, हिरवा चारा, पेंड याबाबतचे प्रमाण ठरवण्याची गरज असते.घोड्यांमध्ये मंडे मॉर्निंग सिकनेस हा आजार आढळून येतो. खूप आराम केल्यानंतर अचानक जास्त अंतर धावल्यास अगर चालल्यास घोड्यांच्या स्नायूंमध्ये आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोटदुखीची, गॅसेसची शक्यता वाढते. अचानक अशा प्रकारचा त्रास उद्भवल्यास वेदनाशामक औषधे दिली जातात. अशा परिस्थितीत जनावरांना आरामाची, वेळेवर औषधोपचारांची गरज असते. अशा वेळी खाण्यापिण्याचीही काळजी घ्यावी लागते.दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी बºयाचदा चारा उपलब्ध होत नाही. अशा वेळी कोकणासह भोर, वेल्हा, मुळशी भागात जनावरांचा भाताचा पेंढा खाऊ घातला जातो. या पेंढ्यावर युरिया ट्रीटमेंट केल्यास तर त्यातील प्रोटिनचे प्रमाण वाढल्यास तो आहार अधिक सकस होतो. उसाचे वाढे खाऊ घातल्यास फॉस्फरस कमी होते आणि विषबाधा होऊ शकते. बºयाचदा, विषारी वनस्पतीही जनावरांकडून नकळतपणे खाल्ल्या जातात. त्यामुळेही त्रास होऊ शकतो. जनावरांची, विशेषत: पालखीतील, शर्यतीतील बैल-घोडे यांची नियमित तपासणी करणे गरजेचे असते. घोड्याचे आयुर्मान २५ ते ३० वर्षे, तर बैलाचे आयुर्मान १५ ते २० वर्षे असते. प्राण्यांची देखभाल कशी केली जाते, यावर त्यांची कार्यक्षमता अवलंबून असते. पशुपालकांमध्ये जागरुकता वाढत असल्याने आणि अद्ययावत उपचार, तपासणी उपलब्ध असल्याने जनावरांची आगाऊ काळजी घेता येते.घोडे पालखीला मार्गस्थ होण्याच्या चार दिवस आधीपासून त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. वारीमध्ये डॉक्टरांचे पथक नेमले जाते. एका पथकामध्ये चार-पाच डॉक्टरांचा समावेश असतो. मुक्कामाच्या ठिकाणी तसेच ज्या कार्यक्षेत्रातून पालखी जाणार आहे, तेथील पशुवैद्यकीय दवाखान्यांना सतर्क केले जाते.
जनावरांचा आहार सकस, प्रमाणित असावा - श्रीराम पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:28 AM