डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलडाणा येथे शिक्षण घेत असलेला कृषिदूत रितेश आनंदा सुकाळे याने ग्रामीण कृषी कार्यक्रमाअंतर्गत जनावरांवर व पशुपक्ष्यांवर होणारे विविध संसर्गजन्य आजारांवर लसीकरण केले तसेच विविध संसर्गजन्य आजार व त्यावर करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना या विषयावर पशु वैद्यकीय डॉ. सयाजी गाढवे, डॉ. संतोष गाढवे यांच्याकडून मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ व कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. गायकवाड विषयतज्ज्ञ प्रा. पी. जी. काळमेघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : जनावरांच्या आजारांवर मार्गदर्शन करताना कृषिदूत रितेश सुकाळे.