नारायणगाव : जनावरांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे १ हजार किलो गोमांस बेकायदा वाहतूक करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी दिली.
मेहराज खतीब शेख (वय ४०, रा. निमबाला, ता. संगमनेर, जि. अ. नगर), अस्लम मोहम्मद शेख (वय ३७, रा. मदिनानगर, ता. संगमनेर, जि. अ. नगर) या दोघांवर गोवंशहत्या (सुरक्षा) महाराष्ट्र संरक्षण सुधारणा कायदा कलम ५, ५ (क), ९ (अ) व भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलम ११ तसेच व मो. व्हे. अॅक्ट ६६/१९२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शामसुंदर सुग्रीव जायभाये यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोडे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार : नारायणगाव बस स्थानकासमोरील मुख्य चौकात नाकाबंदी सुरू असताना आज (दि. २) मध्यरात्री ३.३० च्या सुमारास आळेफाट्याकडून पुणे दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा कंपनीची पिकअप (एमएच ४८ टी ४४९७) ची तपासणी केली असता वाहनात पांढºया रंगाच्या गोण्यांमध्ये बेकायदारीतीने गोमांस वाहतूक करीत असताना मिळून आले.१ लाख २० हजाराचा माल जप्त४पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई घोडे पाटील, सहायक फौजदार के. डी. ढमाले, पोलीस नाईक आर. आर. शिंदे, शामसुंदर जायभाये, स्वप्निल लोहार, काळे यांनी केली.या कारवाईत १ लाख २० हजार रुपयेकिमतीचे बेकायदारीत्या कत्तल केलेल्या जनावरांच्या अवयवाचे मांसासह ३ लाख ५० हजार रुपये किमतीची पांढºया रंगाची महिंद्रा पिक-अप गाडी (एमएच ४८ टी ४४९७) असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.