३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कळस : वालचंदनगरजवळील शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथे गस्त घालत असताना पोलिसांनी जनावरे चोरीच्या संशयावरून तिघांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुनील विश्वास गंगावणे, अक्षय दादा बोरकर, संदीप सुरेश फाळके (सर्व रा. गुणवडी, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरे चोरीचे प्रमाण वाढलेले होते. तसेच, लॉकडाऊनच्या काळामध्ये चोरीचे गुन्हे घडू नयेत याकरिता दिवसा व रात्री पेट्रोलिंगकरिता पोलीस अंमलदार यांची नेमणूक केली होती. गुरुवारी (दि. २४) पहाटे २ च्या सुमारास काझड लाकडी मार्गाने गस्त घालत असताना शिंदेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील माळवेवस्ती जवळ एक टेम्पो त्यांना संशयतीरीत्या आढळला. पोलिसांनी टेम्पो थांबविला. त्यात शेळ्या होत्या. याबाबत टेम्पोमधील सुनील विश्वास गंगावणे, अक्षय दादा बोरकर,संदीप सुरेश फाळके यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे दिली. यामुळे त्यांनी तिघांनाही पोलील ठाण्यात आणले. शिंदेवाडीचे पोलीस पाटील स्वप्निल शिंदे यांनी फोनवरून गावात शेळ्या चोरी झाल्याबाबत सांगितले. तिघांना याबाबत विचारले असता त्यांनी किसन दत्तु माळवे यांच्या घरासमोरून शेळ्या चोरल्याचे सांगितले. आरोपींकडून ३० हजारांच्या दोन शेळ्या, १० हजार रुपयांचे एक बोकड तर ३ लाख रुपयांचा एक टेम्पो, असा ३ लाख ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फोटो : वालचंदनगरला जनावरे चोरणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे.
२६०६२०२१ बारामती—१६