पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.लोकपाल विधेयक संमत होऊन कायदा तयार झाल्यावरही राज्य सरकार लोकपालाची निवड करण्यास तयार नसल्याने हजारे यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लोकपाल विधेयकासाठी हजारे यांनी सुरुवातीपासून लढा दिला आहे. हे लोकपाल विधेयक संमत व्हावे यासाठी हजारे यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकालात प्रयत्न केले होते. त्यानुसार १७ डिसेंबर २०१३मध्ये लोकपालसाठी विशेष अनुभव बोलावण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १६ जानेवारी २०१४ला कायद्याचे राजपत्र काढण्यात आले.यानंतर लोकपालाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राज्यात संबंधित सरकारने लोकपालाची नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र तरीही वारंवार चौकशी करूनही नेमणूक न झाल्याने हजारे यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. या विषयावर बोलताना ते म्हणाले की,लोकपाल नेमणुकीकरिता अनेक वेळा पत्रं पाठवली. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही याविषयी विचारणा केली पण सरकार जाणीवपूर्वक लोकपालाची नेमणूक करत नाही. हा लोकशाही असलेल्या देशात संसदेचा व कायद्याचा अवमान आहेव म्हणून मी जाहीर केलेले आंदोलन सुरू करणार आहे. यावेळी प्रदिप मुनोत, बाळासाहेब माने, मिलींद पवार आदी उपस्थित होते.
....म्हणून अण्णा हजारे पुन्हा करणार आंदोलन !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 8:32 PM