शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

कारेगावच्या महिलांचे अण्णा हजारेंना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 2:10 AM

एमआयडीसीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

शिरूर : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील अवैध धंदे बंद व्हावेत, यासाठी कारेगावातील अवैध धंदे स्वत: उद्ध्वस्त करणाऱ्याकारेगाव येथील रणरागिणींनी धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन या प्रश्नातलक्ष घालण्याची मागणी केली.एमआयडीसी व परिसरातील गांवांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्ये सुरू आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर कारेगाव येथील महिलांनी पोलीस कारवाई करीत नसल्याचा निषेध करीत महिलादिनी अवैध धंदे उद्ध्वस्त केले. महिलांनी हे धंदे उद्ध्वस्त केल्याने या महिलांना अवैध धंदेवाल्यांचे धमकीचे कॉलही आले. पोलीस याबाबत ठोस कारवाई करीत नसल्याने या महिलांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची भेट घेऊन या अवैध धंद्याबाबत हजारे यांना अवगत केले व एमआयडीसी परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने बोकाळलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्त केले.हजारेंनी केले महिलांचे कौतुकएमआयडीसीचे अधिकारी, कारेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी या धंद्यांना कशाच्या आधारे परवानगी दिली, याबाबत माहिती देण्याचे आवाहन या महिलांनी हजारे यांना केले. महिलांच्या या व्यथा जाणून घेतल्यानंतर अण्णा हजारे यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. या प्रश्नाबाबत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन हजारे यांनी दिल्याचे महिलांनी सांगितले. हजारे यांनी महिलांच्या बहादुरीचे कौतुक केले.स्थानिक पुढारी, स्वयंघोषित नेते लक्ष देत नसल्याने या महिलांनी हजारे यांच्याकडे धाव घेतली. हजारे यांनीही थेट पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी संपर्क साधल्याने अवैध धंद्यांवर कारवाई होईल, असा विश्वास महिलांमध्ये निर्माण झाला आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे