पुणे : गेल्या ६३ वर्षांपासून घराघराचा अविभाज्य भाग बनलेल्या आकाशवाणी पुणे केंद्राचा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. पी. बी. जैन फाऊंडेशनच्या वतीने आकाशवाणी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त ‘स्पर्श’ या एडसग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसमवेत संवाद साधण्यात आला. या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘स्पर्श’ संस्थेच्या मुलांसमवेत केक कापून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा जयंतीनिमित्त आकाशवाणीला प्रदान करण्यात आल्या. या वेळी उपमहानिरिक्षक आशिष भटनागर, सहाय्यक निदेशक रवींद्र खासनीर, फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल जैन, राम तोरकडी, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आकाशवाणी पुणे केंद्राचा वर्धापन दिन
By admin | Published: October 12, 2016 1:31 AM