घोडेगाव येथे आदिम संस्थेच्या कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मसुदा समिती सदस्य जयपालसिंह मुंडा व सामजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती किसान सभा, आदिम संस्था व एसएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास किसानसभेचे डॉ. अमोल वाघमारे, सिटू कामगार संघटनेचे पुणे जिल्हा सचिव वसंत पवार, केंद्रप्रमुख काळुराम भवारी, योगेश घोडेकर, वसतिगृह अधीक्षक धनंजय टकले उपस्थित होते. प्रास्ताविक राजू घोडे यांनी केले. आभार अविनाश गवारी यांनी मानले.
या वेळी अजित अभ्यंकर म्हणाले, मुस्लीम समाजातील बुरख्याची चाल व महिलांचे शिक्षण यामध्ये काम होणे गरजेचे आहे. समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांनी ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे काम पुढे नेले. त्यांनी मागासवर्गीयांच्या विकासासाठी मिशन सुरू केले. अस्पृश्यतेच्या विरोधात देशातील पहिली परिषद त्यांनी घेतली.
चौकट
जयपालसिंह मुंडा हे बिहारचे होते व भारतीय संविधान समितीचे सदस्य होते तसेच भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. संविधानामध्ये आदिवासींच्या हितकार तरतुदी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता, असे डॉ.अमोल वाघमारे यांनी सांगितले.
घोडेगाव येथे आदिम संस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित अभ्यंकर.