या वेळी आनंद थोरात, मधुकर दोरगे, दौंड विभागीय अधिकारी नीलेश थोरात, रामचंद्र चौधरी, नितीन दोरगे, सरपंच सुनील सोडनवर, त्रिंबक सोडनवर, डी. डी. धायगुडे, संजयनाना धायगुडे, कैलास शेंडगे, राजेंद्र कोळपे, सरपंच संतोष दोरगे, लक्ष्मण काटकर, संदीप आडसुळ, रामभाऊ चौधरी, रवींद्र दोरगे, विठ्ठल दोरगे, राजेंद्र खैरे, सुरेश काळखैरे, धनंजय पवार, दीक्षा ताडगे, अरविंद जाधव उत्तम चौधरी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की,
अवघ्या तीन वर्षांत भांडगाव शाखेचे खातेदार एक हजार ५०२ तर चौफुला शाखेचे खातेदार दोन हजार ४०० वर पोहोचले असून नफा सुमारे ८.५० लाखांवर आहे. शिवाय मार्चअखेर १०० टक्के वसूल देखील झाला आहे.
भांडगाव शाखेच्या एटीएममधून दररोज सुमारे ८ लक्ष रुपये अदा होतात. येणाऱ्या काळात शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कल्याणकारी योजना राबवून खातेदारांना फायदा देण्याचा बँकेचा प्रयत्न राहणार आहे. अवघ्या ३ वर्षांत शाखांची ही घोडदौड कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
०४ केडगाव
भांडगाव जिल्हा बँकेचे शाखेचा वर्धापन दिन साजरा करताना रमेश थोरात व इतर.